एक्स्प्लोर

Sri Lanka Economic Crisis : श्रीलंकेत सरकारविरोधी निदर्शनं सुरूच, आंदोलकांचा राष्ट्रपती भवनावर मोर्चा

Sri Lanka Economic Crisis : श्रीलंका सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. नागरिकांकडून सरकारविरोधी निदर्शनं सुरू आहेत. मोठ्या संख्येने आंदोलक राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे कूच करत आहेत.

Sri Lanka Economic Crisis : आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेत सोमवारी रात्रीपर्यंत सरकारविरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शनं सुरू होती. मोठ्या संख्येने आंदोलक राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या निवासस्थानाकडे कूच करताना दिसले. श्रीलंकेत लागू करण्यात आलेला 36 तासांचा कर्फ्यू सोमवारी उठवण्यात आला आहे. त्यानंतर लोक रस्त्यावर उतरून सरकारविरोधी घोषणाबाजी करताना दिसत आहेत. सोमवारी राजधानी कोलंबो शहरातील गॅले रोडवर आंदोलकांच्या समर्थनार्थ कार आणि इतर वाहनांमधील मोठ्या संख्येने लोक हॉर्न वाजवताना दिसले. सरकारविरोधी निदर्शनं तीव्र झाली असून नागरिक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करताना दिसत आहेत.

मिळालेल्या वृत्तानुसार, आर्थिक संकटामुळे त्रस्त आंदोलकांना रोखण्यासाठी बॅरिकेड्स उभारण्यात आले होते. कोलंबोतील फॉल्स रोडवर आंदोलकांना राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे जाण्यापासून रोखण्यासाठी उभारण्यात आलेले बॅरिकेड्स आंदोलकांनी पाडले आहेत. सध्या श्रीलंकेच्या अनेक भागात सरकारविरोधात निदर्शनं सुरू आहेत.

आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी या संकटाच्या काळात पुढच्या टप्प्याबाबत सत्ताधारी पक्षाच्या खासदारांसोबत एक महत्त्वाची बैठक बोलावली असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या आंदोलक राजपक्षे सरकारला जोरदार विरोध करत आहेत. तसेच पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.

दरम्यान, राष्ट्रपतींच्या बैठकीनंतर श्रीलंकेतील एसएलपीपीचे महासचिव सागर करियावासम म्हणाले की, 'सत्ताधारी पक्षाचे खासदारांची राष्ट्रपतींसोबत भेट झाली. यावेळी बैठकीत आम्ही आमचे मत राष्ट्रपतींसमोर ठेवले आहे. आमच्याकडे बहुमत आहे, त्यामुळे अध्यक्ष राजपक्षे राजीनामा देणार नाहीत.'

महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

नेपाळमध्ये पुन्हा तरुणाईच्या आंदोलनाचा भडका! तीन दिवसात तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, नेमकं काय घडतंय? पंतप्रधानांवर जनविरोधी आणि हुकूमशाही पद्धतीने शासन केल्याचा आरोप
नेपाळमध्ये पुन्हा तरुणाईच्या आंदोलनाचा भडका! तीन दिवसात तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, नेमकं काय घडतंय? पंतप्रधानांवर जनविरोधी आणि हुकूमशाही पद्धतीने शासन केल्याचा आरोप
ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता
ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता
Iran War Live Update: 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'वरून अमेरिका आणि इराणचा संघर्ष थांबता थांबेना; अमेरिकेनं 140 ठिकाणी केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून पाच देशांवर ड्रोन मिसाईलींचा मारा
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'वरून अमेरिका आणि इराणचा संघर्ष थांबता थांबेना; अमेरिकेनं 140 ठिकाणी केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून पाच देशांवर ड्रोन मिसाईलींचा मारा
30 हजार फूट उंचीवर विमानाची खिडकीची काच फुटली अन् प्रवाशाचं डोकं आणि खांदा बाहेर गेला, बायकोनं पाय धरून वाचवलं! भीषण दुर्घटना सुदैवाने टळली
30 हजार फूट उंचीवर विमानाची खिडकीची काच फुटली अन् प्रवाशाचं डोकं आणि खांदा बाहेर गेला, बायकोनं पाय धरून वाचवलं! भीषण दुर्घटना सुदैवाने टळली

व्हिडीओ

Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray and Sonam Wangchuk: प्राणांतिक उपोषण सोडण्याची विनंती सोनम वांगचूक उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'माझं काहीही झालं तरी चालेल, पण देशाचं भलं झालं पाहिजे'
प्राणांतिक उपोषण सोडण्याची विनंती सोनम वांगचूक उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'माझं काहीही झालं तरी चालेल, पण देशाचं भलं झालं पाहिजे'
राम मंदिरातील लुटीवर 'सर्वोच्च' प्रहार! सुप्रीम कोर्टाने SIT रिपोर्ट मागितला, यूपी-केंद्र सरकार, ट्रस्टला सद्धा नोटीस धाडली, CCTV सुरक्षित ठेवण्याचे निर्देश
राम मंदिरातील लुटीवर 'सर्वोच्च' प्रहार! सुप्रीम कोर्टाने SIT रिपोर्ट मागितला, यूपी-केंद्र सरकार, ट्रस्टला सद्धा नोटीस धाडली, CCTV सुरक्षित ठेवण्याचे निर्देश
Jejuri Varkari Accident: जेजुरीत वारीतील माऊलींचा अपघात; चालकाला तापाच्या गोळ्यांमुळे ग्लानी आली अन् नियंत्रित ट्रक थेट वारकऱ्यांच्या गर्दीत शिरला, तिघांचा अंत
जेजुरीत वारीतील माऊलींचा अपघात; चालकाला तापाच्या गोळ्यांमुळे ग्लानी आली अन् नियंत्रित ट्रक थेट वारकऱ्यांच्या गर्दीत शिरला, तिघांचा अंत
'एकतर आपण 'विश्वगुरू-विश्वगुरू' असं म्हणणं बंद तरी केलं पाहिजे, नाहीतर मग सगळा मूर्खपणा थांबवला पाहिजे..' अनुराधा पौडवाल का संतापल्या?
'एकतर आपण 'विश्वगुरू-विश्वगुरू' असं म्हणणं बंद तरी केलं पाहिजे, नाहीतर मग सगळा मूर्खपणा थांबवला पाहिजे..' अनुराधा पौडवाल का संतापल्या?
Video: सुसाट स्कॉर्पिओ थेट धावत्या डंपरमध्ये मागून घुसली, पाच जणांचा मृत्यू; बचावासाठी जीवाच्या आकांताने किंकाळ्या, देवदर्शन करून परत येताना काळाचा घाला
Video: सुसाट स्कॉर्पिओ थेट धावत्या डंपरमध्ये मागून घुसली, पाच जणांचा मृत्यू; बचावासाठी जीवाच्या आकांताने किंकाळ्या, देवदर्शन करून परत येताना काळाचा घाला
SIR In Maharashtra: मतदार यादीत आपले नाव नोंदवणाऱ्या प्रत्येक नवीन मतदाराला त्यांच्या पालकांचा SIR तपशील द्यावा लागणार! निवडणूक आयोगाने हा नियम का केला?
मतदार यादीत आपले नाव नोंदवणाऱ्या प्रत्येक नवीन मतदाराला त्यांच्या पालकांचा SIR तपशील द्यावा लागणार! निवडणूक आयोगाने हा नियम का केला?
Vinayak Raut on Girija Raut: गिरीजा राऊतांच्या गंभीर आरोपांमागे मोठे राजकीय षडयंत्र? विनायक राऊतांचा खळबळजनक खुलासा; म्हणाले, 'मागील महिन्यातच आमची...'
गिरीजा राऊतांच्या गंभीर आरोपांमागे मोठे राजकीय षडयंत्र? विनायक राऊतांचा खळबळजनक खुलासा; म्हणाले, 'मागील महिन्यातच आमची...'
Sanjay Raut: सोनम वांगचूक शरीराने कोसळले, सरकारला बळी हवाय, त्यांना लढणारे लोक नको आहेत, तुरुंगात टाकता येत नसल्याने असं मारू इच्छित; संजय राऊतांचा सडकून प्रहार
सोनम वांगचूक शरीराने कोसळले, सरकारला बळी हवाय, त्यांना लढणारे लोक नको आहेत, तुरुंगात टाकता येत नसल्याने असं मारू इच्छित; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Embed widget