Jaipur Mumbai Train Firing Case : आरोपीच्या संमतीशिवाय नार्को टेस्ट करणं कायदेशीर नाही, कोर्टाचं महत्वाचं निरीक्षण
आरोपीच्या संमतीशिवाय नार्को टेस्ट करणं कायदेशीर नाही. पोलिस चौकशीत गप्प राहण्याचा आरोपीला अधिकार असल्याचे निरीक्षण जयपूर मुंबई एक्सप्रेस गोळीबार प्रकरणी कोर्टानं नोंदवलं आहे.
Jaipur Mumbai Train Firing Case : जयपूर मुंबई एक्सप्रेस गोळीबार प्रकरणी (Jaipur Mumbai Train Firing Case) कोर्टानं महत्वपूर्ण निरक्षण नोंदवलं आहे. आरोपी चेतन सिंहच्या (Chetan Singh) नार्को टेस्टची परवानगी नाकारताना कोर्टानं हे महत्वाच निरीक्षण नोंदवलं आहे. आरोपीच्या संमतीशिवाय नार्को टेस्ट करणं कायदेशीर धरुन नाही. पोलिस चौकशीत गप्प राहण्याचा आरोपीला अधिकार असल्याचे निरीक्षण कोर्टानं नोंदवलं आहे.
बोरिवली लोहमार्ग पोलिसांनी आरोपी चेतन सिंह हा चौकशीत सहकार्य करत नसल्यानं त्याची नार्को टेस्ट करण्याची परवानगी मागितली होती. मात्र, चेतन सिंहच्या वकिलांनी या नार्को आणि पॉलिग्राफ टेस्टला विरोध केला होता. त्यानंतर महानगर दंडाधिकारी न्यायालयातील एस एम पाटील यांनी याबाबत आदेश दिले होते.
नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्रातील पालघर रेल्वे स्थानकाजवळ (Palghar Railway Station) रेल्वे सुरक्षा दलाच्या एका हवालदाराने आपल्या वरिष्ठ सहकाऱ्याची आणि दोन बोगीतील तीन प्रवाशांची आणि जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये (Jaipur Mumbai Central Express) हत्या केली होती. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आरोपी आरपीएफ जवानाला (RPF Constable) अटक करण्यात आली होती. त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रवाशांची हत्या केल्यानंतर आरोपी चेतन सिंहचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता.
आरोपी आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंग (34) याने आरपीएफचे सहाय्यक उपनिरीक्षक टिका राम मीना आणि B5 कोचमधील अन्य एका प्रवाशाला त्याच्याजवळील स्वयंचलित शस्त्राने गोळ्या घालून ठार केले. त्याने B6 कोचमधील आणखी एका प्रवाशाला गोळ्या घालून ठार मारले. त्याशिवाय, B5 आणि B6 डब्यांच्या दरम्यान असलेल्या पॅन्ट्री कारमधील आणखी एकाची हत्या केली असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली होती. पालघरमध्ये गोळीबार केल्यानंतर मीरा रोड आणि दहिसर दरम्यान प्रवाशांनी साखळी खेचली आणि एक्स्प्रेस थांबवली. त्यावेळी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी चेतन सिंहला रेल्वे पोलिसांनी पकडले. अब्दुल कादिरभाई मोहम्मद हुसेन भानपुरवाला (48), अख्तर अब्बास अली (48) आणि सदर मोहम्मद हुसेन अशी मृत प्रवाशांची नावे आहेत. मुंबईकडे जाणाऱ्या जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसने वापी (गुजरात) स्थानक ओलांडल्यानंतर पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
महत्त्वाच्या बातम्या :