एक्स्प्लोर
रेड झोनमधील विमानतळं सुरु करणं अत्यंत धोकादायक, विमानसेवा सुरु करण्याच्या निर्णयाला गृहमंत्री अनिल देशमुखांचा विरोध
देशांतर्गत विमान वाहतूक उद्या, 25 मे पासून नियंत्रित पद्धतीनं सुरु होत आहे.राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मात्र विमानसेवा सुरु करण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे.
मुंबई : देशांतर्गत विमान वाहतूक 25 मे पासून नियंत्रित पद्धतीनं सुरु होत आहे. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक कधी सुरु होणार याचीही उत्सुकता आहे. असं असलं तरी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मात्र विमानसेवा सुरु करण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. मध्यरात्री ट्वीट करत त्यांनी विमानसेवा सुरु करणं धोक्याचं असल्याचं म्हटलं आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, 'रेड झोन मधील विमानतळ अशा परिस्थिती मध्ये सुरू करणे अत्यंत धोकादायक आहे. स्वॅब शिवाय प्रवाशांचे नुसतं थर्मल स्कॅनिंगचा काय फायदा? सध्या रिक्षा, टॅक्सी, बस सेवा मोठ्या प्रमाणात चालविणे शक्य नाही. पॉझिटिव्ह प्रवाशाला रेड झोनमध्ये आणून तेथील धोका वाढविणे हे चुकीचे आहे.'
हे ही वाचा- आंतरराष्ट्रीय विमानसेवा ऑगस्टआधी सुरु करण्याचा प्रयत्न करू : हरदीप सिंह पुरी
ग्रीन झोन मधील प्रवाशांना रेड झोन मध्ये आणून संसर्ग/ प्रादुर्भावाचा धोका का वाढवायचा? व्यस्त विमानतळांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरीने चालविण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता पडणार आहे, त्यामुळे आपोआपच धोका ही वाढेलच, असं देखील अनिल देशमुखांनी म्हटलं आहे.
रेड झोन मधील विमानतळ अशा परिस्थिती मध्ये सुरू करणे अत्यंत धोकादायक आहे.स्वॅब शिवाय प्रवाशांचे नुसतं थर्मल स्कॅनिंग चा काय फायदा? सद्या रिक्षा, टॅक्सी, बस सेवा मोठ्या प्रमाणात चालविणे शक्य नाही. पॉझिटिव प्रवाशाला रेड झोन मध्ये आणून तेथील धोका वाढविणे हे चुकीचे आहे.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) May 23, 2020
देशांतर्गत विमान वाहतूक उद्या, 25 मे पासून नियंत्रित पद्धतीनं सुरु होत आहे. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक कधी सुरु होणार याचीही उत्सुकता आहे. . आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक ऑगस्ट महिन्याच्या आधी सुरु करण्याचा प्रयत्न करू असं केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी म्हटलं आहे. 25 मार्चपासून देशातली विमान वाहतूक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बंद करण्याची घोषणा करण्यात आली होती. सुरुवातीला सरकार देशांतर्गत वाहतूक 33 टक्के क्षमतेनं पूर्वपदावर आणणार आहे. त्यासाठी विशेष नियमावलीही सरकारनं जाहीर केलेली आहे. देशाबाहेर अडकलेल्या नागरिकांसाठी सरकारचं वंदे भारत मिशन सध्या सुरू आहे. पण आंतरराष्ट्रीय विमान वाहतूकीस मात्र सरकारनं अद्याप हिरवा कंदील दिलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर बोलताना केंद्रीय वाहतूक मंत्री हरदीप पुरी म्हणालेत, "ऑगस्ट किंवा सप्टेंबरच्या आधी आम्ही आंतरराष्ट्रीय सेवा सुरु करू शकू असा विश्वास मला वाटतोय, जरी पूर्ण क्षमतेनं ही वाहतूक तोपर्यंत सुरु होऊ शकली नाही, तरी किमान काही ठराविक टक्के क्षमतेनं तरी ती सुरु करू". जगातल्या अनेक राष्ट्रांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा काही काळ बंद ठेवली आहे. यापूर्वी देशातील विविध भागात अडकलेल्या नागरिकांसाठी देशांतर्गत विमान वाहतूक येत्या 25 मेपासून सुरु होणार असून त्यासाठी सर्व विमानतळे सज्ज ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. कोरोनाच्या या संकटाच्या काळात विमान कंपन्यांकडून प्रवाशांची लूट होऊ नये यासाठी तीन महिन्यांसाठी हे कमाल किमान दर निश्चित करण्यात आले आहेत.ग्रीन झोन मधील प्रवाशांना रेड झोन मध्ये आणून संसर्ग/ प्रादुर्भावाचा धोका का वाढवायचा? व्यस्त विमानतळांना कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सावधगिरीने चालविण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता पडणार आहे, त्यामुळे आपोआपच धोका ही वाढेलच!#PlanningOverAdHocism#MaharashtraGovtCares
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) May 23, 2020
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
क्रीडा
क्रीडा
Advertisement