(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangli Crime : इस्लामपूर पोलिसांनी 15 गावांमध्ये 2 दिवस शेतकरी वेशांतर करून ट्रक चोरट्याला केलं जेरबंद!
Sangli Crime : चोरीच्या ट्रकच्या शोधासाठी 15 गावात 2 दिवस इस्लामपूर पोलिसांनी शेतकरी वेशांतर करुन ट्रक चोरट्यांला ट्रकसह जेरबंद करण्यात यय मिळवले. दत्तात्रय बापू कांबळे असे त्याचे नाव आहे.
Sangli Crime : चोरीच्या ट्रकच्या शोधासाठी 15 गावात 2 दिवस इस्लामपूर पोलिसांनी शेतकरी वेशांतर करुन ट्रक चोरट्यांला ट्रकसह जेरबंद करण्यात यय मिळवले. लोकांना शंका येऊ नये म्हणून ऊसतोडणी टोळ्यांना नेण्यासाठी आलो आहे, असे सांगत शेतकरी बनलेल्या पोलिसांनी 15 गावांमध्ये भटकंती करत या चोरट्यास पकडले.
उस्मानाबाद व बीड जिल्हा हद्दीतील 15 गावात 2 दिवस पोलिसांना शेतकरी वेशांतर करुन या चोरट्याचा माग काढावा लागला. इस्लामपूर जवळील पेठ नाका येथून हा ट्रक चोरीला गेला होता. दत्तात्रय बापू कांबळे (वय 26 , रा. सांगोला, जि. सोलापूर) असे त्याचे नाव आहे. त्याला स्थानिक न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. त्याच्यावर सांगली, सोलापूर, मुंबई या जिल्ह्यांत अनेक गुन्हे दाखल आहेत.
इस्लामपूर येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी सोलापूर, सांगली जिल्ह्यांसह मुंबई परिसरातून मोठ्या वाहनांची चोरी करण्यात तरबेज असलेल्या वाहनचोरट्यास उस्मानाबाद येथून जेरबंद केले. चोरीस गेलेला ट्रकही उस्मानाबाद येथून हस्तगत केला. ऊसतोडणी टोळ्यांना नेण्यासाठी आलो आहे, असे सांगत शेतकरी वेशांतर पोलिसांनी 15 गावांत भटकंती करत या चोरट्यास पकडले.
पेठनाका येथून 24 ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या पहिल्या पहाटे धनाजी जाधव (रा. महादेववाडी, ता. वाळवा) यांच्या मालकीच्या 18 लाख रुपये किमतीचा 12 चाकी ट्रकची चोरी झाली होती. पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पथकाला सूचना दिल्या होत्या. गुन्हे प्रकटीकरण शाखेने गोपनीय माहिती काढत उस्मानाबाद व बीड जिल्हा हद्दीतील 15 गावांत 2 दिवस शेतकरी वेशांतर करून या चोरट्याचा माग काढला.
तो उस्मानाबाद जिल्ह्यात ट्रक विक्री करण्यासाठी येणार असल्याची बातमी मिळताच त्यास चोरीस गेलेल्या ट्रकसोबत ताब्यात घेतले. यावेळी त्याने पेठनाका येथून ट्रक चोरल्याची कबुली दिली. इस्लामपुर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रविण साळुंखे, हवालदार दिपक ठोंबरे, अरुण पाटील, आलमगीर लतिफ, सचिन सुतार, सुनील शिंदे यांनी गोपनीय माहिती काढत चोरट्याचा माग काढला. तो उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब पोलीस ठाणे हद्दीत ट्रक विक्री करण्यासाठी येणार असल्याची बातमी मिळताच त्यास चोरीस गेलेल्या टकसोबत ताब्यात घेतले. यावेळी त्याने पेठनाका येथून हा ट्रक चोरल्याची कबुली दिली.
या कारवाईत सांगली सायबर सेलचे कॅप्टन गुंडेवाड यांच्यासह उस्मानाबादच्या गुन्हे शाखेचे अमोल चव्हाण, अशोक ढगारे यांचे सहकार्य मिळाले.