एक्स्प्लोर
शिवसंपर्क अभियानातून उद्धव ठाकरेंची विधानसभेची तयारी?
औरंगाबाद : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादेतील संभाव्य उमेदवारांची यादी मागवल्याची
माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे 2019 च्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागले
आहेत, की मध्यावधी निवडणुकांच्या, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शिवसेनेचं शिवसंपर्क अभियान औरंगाबादमध्ये दाखल झालं आहे. उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर असून रविवारी ते औरंगाबादमध्ये कामाचा आढावा घेणार आहेत. त्याचवेळी उद्धव ठाकरेंनी विधानसभेची तयारीही सुरु केल्याचं चित्र आहे.
उद्धव यांनी मतदारसंघनिहाय शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांची यादी मागवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना मराठवाड्यातील प्रत्येक मतदार संघातील संभाव्य उमेदवारांची यादी देणार असल्याचं म्हटलं जात आहे.
शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून शिवसेना मध्यावधी निवडणुकांची तयारी करते की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement