एक्स्प्लोर
Advertisement
अब्दुल सत्तार यांची बंडखोरी अशोक चव्हाणांच्या गुप्त सूचनेनुसार?
अब्दुल सत्तार हे अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांची बंडखोरी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या सूचनेने झाल्याची चर्चा आहे
नांदेड : काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांची बंडखोरी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या गुप्त सूचनेवरुन आहे का, असा संशय निर्माण होत आहे. औरंगाबादमधून काँग्रेसने अब्दुल सत्तार यांनाच उमेदवारी दिली होती. आमच्या उमेदवारानेही तुमची इच्छा असेल तर आम्ही माघार घेतो, अशी भूमिका घेतल्याचं चव्हाणांनी स्पष्ट केलं.
अब्दुल सत्तार हे अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. सत्तार बंडखोरीच्या तयारीत असल्यामुळे अशोक चव्हाणांच्या गुप्त सूचनेवरुन ही बंडखोरी झाल्याचा संशय निर्माण होत आहे. औरंगाबादेतून सुभाष झांबड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. खुद्द सत्तार यांनीच चव्हाण आपल्यासाठी तिकीट बदलण्यास तयार होते, असं सांगितलं.
काँग्रेसला रामराम ठोकलेले वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतीक पाटलांशी अजून संपर्क झाला नाही, पण संपर्क होताच प्रतीक पाटलांचे बंड थंड होईल, असा विश्वास अशोक चव्हाणांनी व्यक्त केला.
VIDEO | ...तर चव्हाण माझ्यासाठी तिकीट बदलण्यास तयार : अब्दुल सत्तार
अशोक चव्हाण नांदेडमधून लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरत असून त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला. यावेळी आघाडीतील स्थानिक नेते हजर होते. छाननीमध्ये अर्ज बाद झाला, तर डमी अर्ज म्हणून अशोक चव्हाणांची पत्नी अमिता चव्हाण यांचाही अर्ज दाखल करण्यात आला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement