Bhandara News : पाटबंधारे विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर! कोट्यवधींच्या मशीन्समध्ये उद्घाटनापूर्वीच बिघाड
Bhandara : भंडारा शहरातील पूर परिस्थिती नियंत्रणासाठी तयार केलेल्या कोट्यवधींच्या पंप हाऊसच्या मशीन्समध्ये उद्घाटनापूर्वीच बिघाड झाल्याने पाटबंधारे विभागाच्या कामावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
Bhandara News भंडारा : वैनगंगा नदी आणि गोसीखुर्द धरणाच्या बॅकवॉटरचा फटका भंडारा शहराला बसतो. अतिवृष्टीनंतर निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीमुळं भंडारा शहराला पुराचा चांगलाच फटका बसतो. शहराला पुराचा फटका बसू नये, यासाठी भंडारा शहरातील पाणी बाहेर काढण्यासाठी वैनगंगा नदीच्या काठावर पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून गणेशपूर परिसरात सुमारे 40 कोटी रुपये खर्च करून पंप हाऊसची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या पंप हाऊसचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. इथं साडेसात HP च्या चार मशिन्स मुंबईच्या एका कंपनीच्या माध्यमातून बसविण्यात आल्यात.
जुलै महिन्यात भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आणि शहराच्या अनेक भागात पाण्यानं विळखा घातला. ही परिस्थिती हाताळण्यासाठी या पंप हाऊसच्या चारही मशीनची टेस्टिंग करण्यात आली. मात्र, पंपहाऊस उद्घाटनाच्या पूर्वीचं या सर्व चारही मशिन्स मध्ये बिघाड झालाय. त्यामुळे भंडारा शहरातील पूर परिस्थिती नियंत्रणासाठी तयार केलेल्या पंप हाऊसमधील या धक्कादायक प्रकारामुळे पाटबंधारे विभागाच्या कामावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
कोट्यवधींच्या मशीन्समध्ये उद्घाटनापूर्वीच बिघाड
गेल्या काही दिवसांपूर्वी पूर्व विदर्भात पावसाने दमदार हजेरी लावत एकच दाणादाण उडवली होती. परिणामी वैनगंगा नदी आणि गोसीखुर्द धरणाच्या बॅकवॉटर मध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा जमा झाला होता. तलावांचे शहर म्हणून ओळख असलेल्या भंडारासह लगतच्या अनेक गावखेड्यांना या अतिवृष्टीनंतर निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीचा दरवर्षी सामना करावा लागतो. त्यामुळे यावर उपाय म्हणून भंडारा शहरातील पाणी बाहेर काढण्यासाठी वैनगंगा नदीच्या काठावर पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून सुमारे 40 कोटी रुपये खर्च करून पंप हाऊसची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र कोट्यवधींच्या या मशीन्समध्ये उद्घाटनापूर्वीच बिघाड झाल्याचे समोर आले आहे. 40 कोटी रुपयांच्या या मशीन्स मागील 15 दिवसांपासून बंद पडलेल्या आहेत. त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या या पंप हाऊस च्या कामावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दुथडी भरलेल्या नदीत बैल धुण्यासाठी गेलेला शेतकरी गेला वाहून
भंडाऱ्याच्या लाखनी गावालगतच्या चुलबंद नदी पात्रात बैल धुण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा दुथडी भरून वाहणाऱ्या नदीत वाहून गेल्याची घटना घडली. रूपलाल वलथरे (५४) असं नदीत वाहून गेलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. ही घटना भंडाऱ्याच्या लाखनी तालुक्यातील चुलबंद नदीच्या पाथरी गावाच्या काठावर घडली. नदी दुथडी भरून वाहत असताना रुपलाल यांनी बैल नदीपात्रात सोडलेत. यावेळी दोन्ही बैल नदीपात्रातून पैलतिरी गेल्यानं त्यांना आणण्यासाठी रुपलाल हे बैलांच्या मागे नदीच्या प्रवाहातून जात असताना पाण्याच्या प्रचंड प्रवाहाचा अंदाज त्यांना आला नाही. यामुळं ते वाहून गेलेत. सध्या बोटीच्या माध्यमातून त्यांचा शोध घेतात येत आहे.
वाळूची वाहतूक करणारा भरधाव टिप्पर गोसीखुर्द धरणाच्या कालव्यात पडला
पवनी तालुक्यातील धानोरी परिसरात पहाटेच्या अंधाराचा फायदा घेत वाळूची वाहतूक करणारा भरधाव टिप्पर थेट गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात पडला. ही घटना पवनी तालुक्यातील धानोरी शेतशिवारात घडली. चालकाचं टिप्परवरील नियंत्रण सुटल्यानं ही घटना घडली. टिप्पर कॅनलमध्ये कोसळत असताना चालक आणि वाहकानं उड्या मारून स्वतःचा जीव वाचवल्यानं सुदैवानं दोघेही वाचलेत. गोसीखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्यानं कालव्यात साधारणत: 15 फूटपर्यंत पाणी आहे. त्यामुळं चालक आणि वाहकानं उड्या मारल्यानं सुदैवानं जीवितहानी टळली असून वाळूनं भरलेला टिप्पर कॅनलमधून बाहेर काढण्यासाठी आता टिप्पर मालकाची मोठी दमछाक होत आहे.
हे ही वाचा