एक्स्प्लोर

Pune Crime News: शिक्षणाचं माहेरघर ड्रग्जच्या विळख्यात; पुण्यात तब्बल कोटीचं अमली पदार्थ जप्त

Pune Drugs Case : पुण्याची ओळख आता ड्रग्जचे शहर म्हणून झाली आहे. ललित पाटील प्रकरणानंतर आणि पबमध्ये घडत असलेल्या घडामोडींमुळे तर ड्रग्ज तस्करीचे किती मोठे रॅकेट असेल, याचा अंदाज बांधला जाऊ शकतो.

Pune Drugs Case : पुण्याची ओळख आता ड्रग्जचे (Pune Crime News) शहर म्हणून झाली आहे. ललित पाटील प्रकरणानंतर आणि पबमध्ये घडत असलेल्या घडामोडींमुळे तर ड्रग्ज तस्करीचे किती मोठे रॅकेट असेल, याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात मोठी ड्रग्ज रॅकेट्स (Pune Crime News) समोर येत आहेत. अशातच पुण्यात पुन्हा एकदा ड्रग्ज रॅकेट उघड झालं आहे. विश्रांतवाडी परिसरात एमडी ड्रग्जचा साठा पुणे पोलिसांकडून (Pune Crime News) जप्त करण्यात आला आहे. या ड्रग्जचे बाजार मूल्य एक कोटीपेक्षा जास्त असल्याची माहिती आहे. साधारण अर्धा किलो एमडी डॅक्सचा साठा पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. 

पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातून हे एक कोटीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी 3 तरुणांना (Pune Police) अटक केली आहे. लोहगाव येथील विघ्नहर्ता अपार्टमेंटमधून या तीन तरुणांना ताब्यात (Pune Crime News) घेतले आहे. त्यांच्या ताब्यातून एक कोटी रुपयाचे 471 ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत करण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. श्रीनिवास संतोष गोदजे, रोहित शांताराम बेंडे आणि निमिश सुभाष अभनावे अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल (Pune Crime News) करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा अधिकचा तपास करत पोलिसांनी (Pune Police) ही मोठी कारवाई केली आहे. या संपूर्ण प्रकरणात आंतरराष्ट्रीय रॅकेट असण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, पुणे पोलिसांनी एकाचवेळी कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये अनेक ठिकाणी ड्रग्जचा (Pune Crime News) वापर 30 सप्टेंबर 2023 रोजी ससून रुग्णालयाच्या जवळ तब्बल दोन कोटी रुपयांचे मॅफेड्रॉन हे ड्रग्ज सापडले होते. तेव्हापासूनच ड्रग्जचे पुणे कनेक्शन (Pune Crime News) उघड होण्यास सुरुवात झाली. परंतु, अद्यापही संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी पोहोचणे पोलिसांना शक्य झालेले नाही. शहरात वारंवार ड्रग्ज सापडताना दिसत आहे. शहरातील पबमध्ये ड्रग्जचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. 

ड्रग्जचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा आणि तस्करी कोरेगाव पार्क, कल्याणीनगर त्याचबरोबर खराडीसारख्या उच्चभ्रू भागात होत असल्याने पोलिसांनी या भागावरच सर्वाधिक लक्ष केंद्रित केल्याचं दिसून येत आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget