Kalyan: इमारत पुनर्विकासप्रकरणी बांधकाम परवानगीमधील अनियमितता, केडीएमसीच्या पाच माजी आयुक्तांसह 18 जणांविरुद्ध गुन्हा
Kalyan-Dombivli Municipal Corporation: कल्याण पश्चिमेकडील माणिक कॉलनीतील एक इमारत 2010 मध्ये तर 2012-13 मध्ये दुसरी इमारत पाडण्यात आली होती.
Kalyan-Dombivli Municipal Corporation: कल्याण पश्चिमेकडील माणिक कॉलनी इमारतीचा पुनर्विकासप्रकरणी फसवणूक आणि अनियमितता झाल्याचा ठपका ठेवत कल्याणच्या बाजार पेठ पोलीस ठाण्यात केडीएमसीच्या पाच माजी महापालिका आयुक्तांसह बिल्डर आणि आर्किटेक्ट अशा तब्बल 18 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण न्यायालयाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
कल्याण पश्चिमेकडील माणिक कॉलनीतील एक इमारत 2010 मध्ये तर 2012-13 मध्ये दुसरी इमारत पाडण्यात आली होती. कल्याण पश्चिमेकडील माणिक कॉलनी इमारत पुनर्वसन प्रकरणी केडीएमसी अधिकारी कर्मचाऱ्यांनी विकासकाशी संगनमत करून सर्व नियमांचे उल्लंघन केले. तसेच निर्धारित नियमांचे उल्लंघन करत मालमत्तेच्या विकासास परवानगी दिली असल्याचा आरोप तत्कालीन नगरसेवक अरुण गिध यांनी केला.
गिध यांनी याबाबत केडीएमसीसह पोलिसांना माहिती दिली. मात्र, काहीच कारवाई न झाल्याने अखेर गिध यांनी न्यायालयात धाव घेतली होती. अखेर न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानंतर कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गोविंद राठोड, रामनाथ सोनवणे, एसएस भिसे, ई रवींद्रन , गोविंद बोडके या पाच तत्कालीन केडीएमसी आयुक्तांसह, केडीएमसी अधिकारी, संबंधित विकासक ,आर्किटेकट् अशा 18 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे बाजारपेठ पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली. याप्रकरणातील दोषींवर कोणती कारवाई होते? हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल.
- हे देखील वाचा-
- इंग्रजीच्या भीतीनं साताऱ्यात विद्यार्थीनीची आत्महत्या तर कोल्हापुरात शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून युवतीची आत्महत्या
- Palghar: आर्थिक चणचणीला कंटाळून युवक-युवतीची आत्महत्या, पालघर जिह्यातील घटनेनं खळबळ
- मुंबईसह राज्यातील कोरोना परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात, मुंबई महापालिका आणि राज्य सरकारकडून हायकोर्टात आश्वासन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha