एक्स्प्लोर
Advertisement
International Yoga Day | आज पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिवस, 'या' प्राचीन भारतीय पद्धतीला अशी मिळाली जगमान्यता
2014 साली 11 डिसेंबरला संयुक्त राष्ट्र संघाने योगाचं महत्व मान्य करत 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची घोषणा केली.
मुंबई : आज पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी योगाचे मोठे महत्व आहे. भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व असलेल्या योगाला आज जगभरात मोठे महत्व मिळाले आहे.
या आंतरराष्ट्रीय योग दिवसाची सुरुवात 21 जून 2015 पासून झाली. या प्राचीन भारतीय पद्धतीला जगमान्यता, राज मान्यता मिळवून देण्यासाठी मोदी सरकारने मोठा पुढाकार घेतला.
27 सप्टेंबर 2014 ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संयुक्त राष्ट्र संघातील आपल्या भाषणात आंतरराष्ट्रीय योग दिनाची गरज व्यक्त केली.
भारतातर्फे संयुक्त राष्ट्र महासभेत योग दिवसाची शिफारस केली. 193 पैकी 175 देशांनी प्रस्ताव तात्काळ स्वीकारला. एखादा प्रस्ताव एवढ्या कमी वेळेत म्हणजे 90 दिवसाच्या आत एवढ्या मोठ्या देशांनी स्वीकारण्याची पहिलीच वेळ होती.
2014 साली 11 डिसेंबरला संयुक्त राष्ट्र संघाने योगाचं महत्व मान्य करत 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची घोषणा केली.
21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असल्याने आणि सूर्याचं दक्षिणायन सुरु होण्याचा हा काळ असल्याने या संक्रमण काळात योगाचा जास्त फायदा पोहोचतो म्हणून 21 जूनची निवड या दिवसासाठी करण्यात आली.
यंदा योग दिन साजरे करण्याचे पाचवे वर्ष आहे. यंदाच्या योग दिवसाची YOGA FOR CLIMATE ACTION ही थीम आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये हजारो वर्षांपासून शरीर, मन, आरोग्य निरोगी राखण्यासाठी योगाला महत्व दिलं गेलं आहे.
आजच्या धकाधकीच्या जीवनात मधुमेह, थायरॉईडपासून हृदयरोगांपर्यंत अनेक रोगांचं प्रमाण भीतीदायकरित्या वाढतं आहे. त्यावर योगासनं हा साधा सोपा बिन खर्चाचा पण प्रभावी उपाय मानला गेला आहे.
गेल्या काही वर्षात भारताबाहेर सुद्धा योगाचं महत्व वाढत आहे. जगभरात कोट्यवधी लोक आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
पुणे
निवडणूक
निवडणूक
Advertisement