एक्स्प्लोर
Advertisement
इंदुरीकर महाराजांची बदनामी करणाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल
इंदुरीकर महाराजांचे बदनामी करणारे व्हिडिओ युट्यूबवर पोस्ट करणाऱ्यांविरोधात पुणे सायबर शाखेकडे तक्रार दाखल करण्यात आला आहे. युट्यूबचे व्हिडिओ वापरून महाराजांची बदनामी केल्याचं या तक्रारीत म्हटल आहे.
पुणे : निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांची बदनामी केल्याबद्दल एका वकीलाने स्वतः हून पुण्यातील सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. इंदुरीकर महाराजांचे 8 जुलै 2018 रोजी पुण्याच्या हडपसर भागात किर्तन आयोजित करण्यात आले होते. त्या किर्तनाचे युट्यूबचे व्हिडिओ वापरून औरंगाबादच्या तीन तरुणांनी इंदुरीकर महाराजांची बदनामी केल्याचं या तक्रारीत म्हटल आहे.पांडुरंग शिवलीकर या वकीलांनी ही तक्रार दिली आहे.
'स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला. हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माल आला, असे इंदुरीकर महाराज म्हणाले होते.
Indurikar Maharaj | वाद थांबला नाही तर कीर्तन सोडून शेती करू : इंदोरीकर महाराज | ABP Majha
मात्र हे वक्तव्य गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात असून PCPNDT कायद्याच्या कलाम 22 चे उल्लंघन असल्याचा आरोप याच समितीच्या सदस्याने केला. त्यानुसार PCPNDT सल्लागार समितीने निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना नोटीस पाठवून खुलासा मागितला आहे. इतकेच नाही तर या नोटीस नंतर जर पुरावे मिळाले तर इंदुरीकर महाराजांवर गुन्हा देखील दाखल करण्यात येणार आहे.
गेल्या 26 वर्षांपासून मी कीर्तन करत आहे. या काळात घर आणि कुटुंबापासून नेहमी लांब राहिलो. रात्रंदिवस प्रवास करतो, हे सगळं मी लोकांसाठी केलं. एखाद्या कीर्तनात एखादा शब्द चुकीचा गेला किंवा मी केलेलं वाक्य चुकीचंही नाही, मात्र मला त्रास दिला जातोय. युट्यूबवाले काड्या करतात, युट्यूब चॅनलवाल्यांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला. परंतु चॅनल संपतील पण मी संपणार नाही, असं इंदुरीकर महाराज म्हणाले.
संबंधित बातम्या :
... तर कीर्तन सोडून शेती करेन, निवृत्ती महाराज इंदोरीकरांची उद्विग्न प्रतिक्रिया
इंदुरीकर महाराजांची शिक्षकांची खिल्ली उडवणारी क्लिप व्हायरल, शिक्षक संघटनाची नाराजी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement