(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CNG अलॉटमेन्टमध्ये इंडियन ऑईल आणि अदानी ग्रुपची बाजी, महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांना अदानी पुरवणार CNG
CNG: इंडियन ऑईलला 51 ठिकाणी तर अदानी ग्रुपला 50 ठिकाणी सीएनजी डिस्ट्रिब्युशन करण्याचे अधिकार मिळाले आहेत.
मुंबई: पेट्रोलियम मंत्रालयाच्या नियंत्रक बोर्डने 11 व्या सिटी गॅस डिस्ट्रिब्युशनची (City Gas Distribution -CGD) यादी आज जाहीर केली आहे. त्यामध्ये इंडियन ऑईलनंतर अदानी ग्रुपने बाजी मारल्याचं स्पष्ट झालंय. इंडियन ऑईलला एकूण 51 ठिकाणची सीएनजी डिस्ट्रिब्युशन डीलरशीप मिळाली आहे तर अदानी ग्रुपला 50 ठिकाणची डीलरशीप मिळाली आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक म्हणजे नऊ जिल्ह्यांत सीएनजी पुरवण्याचे अधिकार अदानी ग्रुपला मिळाले आहेत.
या लिलावाची प्रक्रिया ही 17 सप्टेंबर 2021 रोजी पार पडली होती. त्यासाठी देशातील 19 राज्ये आणि एक केंद्र शासित प्रदेशातील 65 ठिकाणे निश्चित करण्यात आली होती.
महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात कोणती कंपनी पुरवणार CNG?
महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे नऊ जिल्ह्यांना सीएनजी पुरवण्याचे काम अदानी ग्रुपला मिळाले आहे. तर तीन जिल्ह्यांमध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड सीएनजी पुरवणार आहे. तसेच तीन जिल्ह्यांना महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड ही कंपनी सीएनजी पुरवणार आहे. तर नागपूर जिल्ह्यातील सीएनजी हे कन्सॉर्टिअम ऑफ एचसीजी, हरयाना सीटी गॅस लिमिटेड या कंपन्यांना मिळाले आहे.
अदानी ग्रुप- अकोला, हिंगोली, वाशिम, अमरावती, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नंदुरबार
महाराष्ट्र नॅचरल गॅस लि.- बुलढाणा, नांदेड, परभणी
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन- बीड, जळगाव, जालना
मेघा इंजिनिअरिंग अॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर लि.- चंद्रपूर आणि वर्धा
महत्त्वाच्या बातम्या :
- CNG,PNG Price : CNG सह घरगुती पाईपलाईन गॅस दरात वाढ; आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू
- CNG : मुंबई, पुण्याच्या तुलनेत नागपुरात 40 रुपयांनी अधिक सीएनजी दर; काय आहे यामागचे गौडबंगाल?
- PNG-CNG Price Hike: PNG-CNG दराचा भडका, सीएनजी 2 रुपयांनी महाग तर घरगुती पाईप गॅसचीही दर वाढ
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha