CNG,PNG Price : CNG सह घरगुती पाईपलाईन गॅस दरात वाढ; आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू
CNG प्रति किलोमागे 2.50 तर PNG प्रति युनिटमागे 1.50 रूपयांनी वाढवण्यात आला आहे. आज (8 जानेवारी 2022) मध्यरात्रीपासून ही नवी दरवाढ लागू होणार आहे.
CNG,PNG Price : इंधन दरवाढीमुळे हैराण असलेल्या सामान्य जनतेला पुन्हा एकदा नव्या दरवाढीचा सामना करावा लागणार आहे. कारण मुंबई आणि परिसरात सीएनजी (CNG) आणि पीएनजीच्या (PNG) दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. सुधारित दरानुसार सीएनजी प्रति किलो 2.50 रुपयांनी, तर घरगुती पाईप (PNG) गॅस 1.50 रुपये प्रति युनिट महाग झाला आहे. आज (8 जानेवारी 2022) मध्यरात्रीपासून ही नवी दरवाढ लागू होणार आहे.
बाजारातील नैसर्गिक वायूच्या किमतीत मोठी वाढ झाल्यामुळे MGL च्या इनपुट गॅसच्या किमतीतही वाढ झाली आहे. त्यामुळे CNG प्रति किलोमागे 2.50 तर PNG प्रति युनिटमागे 1.50 रूपयांनी वाढवण्यात आला आहे. मुंबई आणि परिसरात या सुधारित दर वाढीनुसार सर्व करांसह CNG आता 66 रूपये प्रति किलो तर PNG 39.50 प्रति युनिट दराने मिळणार आहे.
वर्षभरात 18 रूपयांनी वाढला गॅस
दरम्यान, गेल्या वर्षभरात म्हणजे फेब्रुवारी 2021 ते जानेवारी 2022 या कालावधीत सीएनजीच्या दरात 18 रूपयांनी वाढ झाली आहे. जानेवारी 2021 मध्ये 48 रूपये प्रति किलो मिळणारा सीएनजी आता जानेवारी 2022 मध्ये 66 रूपये प्रति किलोने मिळणार आहे.
सामान्य जनता हैराण
आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे हैराण झालेल्या सामान्य जनतेला या दर वाढीमुळे धक्का बसणार आहे. याचा मुंबईकरांना मोठा फटका बसणार आहे. सतत होणाऱ्या दरवाढीला सामान्य जनता कंटाळली आहे. आधीच कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून उत्पन्न कमी झालेले असताना दुसरीकडे ही सतत होणारी दर वाढ सामान्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
महत्वाच्या बातम्या
Mumbai Corona Update : मुंबईत आजही 20 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद
Election 2022 Dates : पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर, UP मध्ये 7 टप्प्यात मतदान, 10 मार्चला निकाल
Mumbai : येत्या दहा दिवसांत ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा बाहेर काढणार : किरीट सोमय्या