लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
मुंबईच्या मुंबई सेंट्रल स्थानकावर आज अहमदाबाद ते मुंबई अशी वंदे भारत स्लीपरची ट्रायल रन घेण्यात आली.
मुंबई : अलीकडेच अमृत भारत ट्रेन प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. भारतीय रेल्वेत (Railway) अनेक मसुधारणा होत असल्याचे दिसत आहे. भारतीय रेल्वेचा संक्रमणाचा आणि कात टाकण्याचा काळ आहे. भारतीय रेल्वे प्रचंड कामगिरीच्या जोरावर अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावत आहे. सन 2025 उजाडले आहे. या आगामी वर्षात भारतीय रेल्वेचे काही महत्त्वाचे प्रकल्प प्रत्यक्षात येऊ शकतात. यापैकी एक अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे वंदे भारत ट्रेनचे स्लीपर व्हर्जन. वंदे भारत रेल्वेनंतर आता वंदे भारत स्लीपर कोच रेल्वे कशी असेल, याची उत्सुकता देशवासीयांमध्ये आहे. ही वंदे भारत स्लीपर (Vande bharat sleeper) नेमकी कशी दिसते, कशी सेवा देते याची उत्सुकता प्रवाशांना आहे. आता, वंदे भारतचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. कारण, वंदे भारत स्लीपरची ट्रायल राजधानी मुंबईत (Mumbai) पार पडली.
मुंबईच्या मुंबई सेंट्रल स्थानकावर आज अहमदाबाद ते मुंबई अशी वंदे भारत स्लीपरची ट्रायल रन घेण्यात आली. भारताची नव्या रुपाची प्रिमियम ट्रेन म्हणून ओळखली जाणारी वंदे भारत आता लवकरच धावण्यास सज्ज झाली होणार आहे आणि तिची चाचणी सध्या सुरू आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेन आता स्लीपर बर्थच्या रुपात येणार आहे. या बदलामुळं प्रवाशांना आता प्रवास करणे अधिक सोयीचे होणार आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनची चाचणी अंतिम टप्प्यात असून चाचणी दरम्यान तब्बल 130 Kmph वेगाने वंदे भारत स्लीपर आज अहमदाबाद ते मुंबई धावली.
वंदे भारत एक्स्प्रेस सुपरफास्ट असल्याने कमी वेळात जास्त अंतर गाठते. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी वंदे भारतने प्रवास करणे सोयीचे ठरते. मात्र, ट्रेनमध्ये फक्त केबल चेअर बसल्याने फक्त बसूनच प्रवास करावा लागत होता. सहा ते सात तासांच्या प्रवासात बसून बसून पाय दुखणे किंवा पाठदुखी होत असल्याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात येत होती. त्यामुळं रेल्वेने वंदे भारत स्लीपर एक्सप्रेसची घोषणा केली होती. या ट्रेनमुळं लांब पल्ल्यांचा प्रवास अधिक आरामदायी आणि जलद होणार आहे. वंदे भारत स्लीपरचा चाचणी अंतिम टप्प्यात आहे.
वंदे भारत स्लीपर ट्रेन ही भारतीय रेल्वेने सादर केलेली एक अत्याधुनिक आणि आरामदायी ट्रेन आहे. जी लांब पल्ल्याच्या प्रवासाला सोयीस्कर आणि आरामदायी बनवण्याच्या उद्देशाने लवकरच सुरू होणार आहे. नवीन वंदे भारत स्लीपर कोच ट्रेनचा यामध्ये ब्रेकिंग सिस्टीम, एअर सस्पेंशन, कप्लर फोर्सची चाचणी घेण्यात आली. ही ट्रेन 180 किमी/तास वेगाने धावण्याची क्षमता असून तिची चाचणी वळणदार ट्रॅकवरही घेण्यात आली आहे. या ट्रेनमध्ये पेन्ट्री कारही असणार आहे. याशिवाय गार्ड कोच, लगेज कोच असणार आहे.
जानेवारी अखेर वंदे भारत स्लीपर सुरू होईल
दरम्यान, वंदे भारत स्लीपर ट्रेनचा मार्ग अद्याप समोर आलेला नाही. पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन दिल्ली-मुंबई किंवा दिल्ली-कोलकाता दरम्यान चालवली जाऊ शकते. यासाठी ट्रेनची ट्रायल घेतली जात असून, त्यात ताशी 160 ते 180 किलोमीटर वेगाने ट्रेन चालवली जात आहे. जानेवारीअखेर ही ट्रेन प्रवाशांसाठी सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.
वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये काय असेल खास?
या ट्रेनमध्ये आरामदायी बर्थ, स्वच्छ आणि आधुनिक टॉयलेट्स, हाय स्पीड वाय-फाय, रीडिंग लाइट्स आणि हाय स्पीड मोबाईल चार्जिंग पॉइंट्स यांसारख्या सुविधा असतील. ही ट्रेन लवकरच रुळांवर पूर्णपणे उतरवण्यात येणार असून काही मार्गांवर ती धावणार आहे.
वंदे भारत स्लीपर ट्रेन ही भारतीय रेल्वेने सादर केलेली एक अत्याधुनिक आणि आरामदायी ट्रेन आहे, जी लांब पल्ल्याच्या प्रवासाला सोयीस्कर आणि आरामदायी बनवण्याच्या उद्देशाने लवकरच सुरू होणार आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेन राजधानी एक्सप्रेस आणि तेजस एक्सप्रेस गाड्यांपेक्षा खूप चांगल्या आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांपेक्षा वेगवान मानल्या जातात. ही ट्रेन लांब पल्ल्यासाठी तयार करण्यात आली आहे.
BEML ने तयार केलेल्या पहिल्या प्रोटोटाइपमध्ये एकूण 16 कोच असतील, ज्यामध्ये 11 AC 3 टियर कोच, 4 AC 2 टियर कोच आणि एक AC फर्स्ट क्लास कोच असतील. तसेच दोन डबे एसएलआर असतील. ही 16 डब्यांची ट्रेन एकूण 823 प्रवाशांना वाहून नेण्यासाठी तयार करण्यात आली आहे, ज्यात एसी 3 टायरमध्ये 611 बर्थ, एसी 2 टायरमध्ये 188 बर्थ आणि एसी 1 मध्ये 24 बर्थ असतील.
वंदे भारत स्लीपर ट्रेनने प्रवास करण्यासाठी तुम्हाला राजधानी आणि तेजस ट्रेनच्या तुलनेत 10 ते 15 टक्के जास्त भाडे द्यावे लागेल, असे मानले जाते.
हेही वाचा
मकोका कायदा काय, कलमं कोणती, जामिनाचा नियम, सरकारी वकिलांची नियुक्ती?; जाणून घ्या सर्वकाही