एक्स्प्लोर

मुंबईत लवकरच IIM सुरू होणार, पवईतील NIIE संस्थेत आयआयएम सुरू करण्याची केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Indian Institutes of Management: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आता आयआयएम सुरु करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

Indian Institutes of Management : आयआयएम (IIM) म्हणजेच  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आता मुंबईत सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीत (Delhi) पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या (Central Government) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला  आहे. हे विधेयक केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूर झाल्यानंतर आता संसदेच्या पावसाळी अधिवेशनात या विधेयकाला मंजुरी देण्यात येईल. 

मुंबईच्या पवईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रिअल इंजिनिअरींग म्हणजेच नीटी या संस्थेलाच आता आयआयएम म्हणून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता मुंबईतील आयआयएममध्ये एमबीएच्या जवळपास साडेतीनशे जागांसाठी प्रवेश दिला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच आता देशातील 21 आणि महाराष्ट्रातील दुसरी आयआयएम शिक्षण संस्था म्हणून मुंबईच्या आयआयएमकडे पाहिलं जाणार आहे. 

आयआयएममध्ये शिकण्याचं अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं. त्यासाठी मग मुंबईतील विद्यार्थी राज्याबाहेरील आयआयएमच्या संस्थेत प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न करतात.  पण केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आता मुंबईतील विद्यार्थ्यांना मुंबईत आयआयएम मधून शिकण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे. देशाची आर्थिक राजधानी असल्यानं मुंबई नेहमीच आयआयएमसारख्या टॉप मॅनेजमेंट संस्थेची गरज भासत असते.

तसेच वेळोवेळी अनेक बड्या उद्योगपतींकडून आयआयएमसारख्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेची मागणी करण्यात येते. यावर गांभीर्याने विचार करण्यासाठी केंद्र सरकारकडून हालचाली सुरु झाल्या होत्या आणि त्यानंतर आता हे महत्त्वाचं पाऊल टाकण्यात आलं आहे. 

मागील वर्षी फेब्रुवारी मध्येच पवईतील नीटी शिक्षण संस्थेला मुंबईचे आयआयएममध्ये रुपांतर करण्यासाठी 5 सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली होती. बीएसईचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अहालाबाद विद्यापीठाचे कुलगुरु आशिषकुमार चौहान यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग (NITIE) मुंबई ही भारत सरकारने 1963 मध्ये स्थापन केलेली एक स्वायत्त संस्था आहे.

 औद्योगिक अभियांत्रिकी, अभियांत्रिकी व्यवस्थापन आणि व्यवस्थापन विज्ञान क्षेत्रातील तरुणांना शिक्षण देण्याचे मोलाचे कार्य नाटी ही संस्था करत आहे.  तसेच विद्यार्थ्यांना देशाच्या आर्थिक विकासात योगदान देण्यासाठी त्यांचे भविष्य घडवण्याचे काम ही संस्था करत असते. llM म्हणजेच  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेच्या कायदाच्या कक्षेत येणार आहे.

देशांतील आयआयएम संस्थेची ठिकाणं

  1. आयआयएम कलकत्ता, पश्चिम बंगाल
  2. आयआयएम अहमदाबाद, गुजरात
  3. आयआयएम बंगलोर,  कर्नाटक
  4. आयआयएम लखनौ, उत्तर प्रदेश
  5. आयआयएम कोझिकोड, केरळ
  6. आयआयएम इंदूर, मध्य प्रदेश
  7. आयआयएम शिलाँग,  मेघालय
  8. आयआयएम रायपूर,  छत्तीसगड
  9. आयआयएम रायपूर,  झारखंड
  10. आयआयएम रोहतक,  हरियाणा
  11. आयआयएम काशीपूर, उत्तराखंड
  12. आयआयएम तिरुचिरापल्ली,  तामिळनाडू
  13. आयआयएम उदयपूर, राजस्थान
  14. आयआयएम अमृतसर, पंजाब
  15. आयआयएम बोध गया, बिहार
  16. आयआयएम नागपूर,  महाराष्ट्र
  17. आयआयएम संबलपूर, ओडिशा
  18. आयआयएम सिरमौर, हिमाचल प्रदेश
  19. आयआयएम विशाखापट्टणम,आंध्र प्रदेश
  20. आयआयएम जम्मू, जम्मू आणि काश्मीर 

हे ही वाचा : 

CUET UG Result 2023 : 'या' तारखेपर्यंत CUET UG परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची शक्यता; 'असा' पाहाल निकाल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरीचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरीचं चॅलेंज 
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
CNG Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
Sharad Pawar : शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Solapur : सोलापुरात महाविकास आघाडीत नेमकं काय घडतंय?Ulhas Bapat Vidhansabha Election 2024 : 26 नोव्हेंबरच्या आज  सरकार स्थापन झाल्यास राष्ट्रपती राजवटMVA Leaders Meeting : अपक्ष आमदारांशी मविआकडून संपर्क; निकालाआधीच मविआची सरकार स्थापनेचे रणनीतीABP Majha Headlines :  12 PM : 22 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरीचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरीचं चॅलेंज 
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
CNG Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
Sharad Pawar : शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
शरद पवार काहीही करु शकतात, त्यांच्याबाबत कुणीही सांगू शकत नाही; शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
भाजप पदाधिकारी माझ्यासोबतच म्हणणाऱ्या सदा सरवणकरांना माहीम विधानसभेत गुलिगत धोका? निकालाच्या आदल्या दिवशी ठाकरेंची खेळी उघड
भाजप पदाधिकारी माझ्यासोबतच म्हणणाऱ्या सदा सरवणकरांना माहीम विधानसभेत गुलिगत धोका? निकालाच्या आदल्या दिवशी ठाकरेंची खेळी उघड
Baba Siddique Case Update: बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील आरोपीने पोलिसांपासून वाचण्यासाठी लढवली शक्कल, फोन बंद केला अन् वापरलं मजुराचं हॉटस्पॉट
बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील आरोपीने पोलिसांपासून वाचण्यासाठी लढवली शक्कल, फोन बंद केला अन् वापरलं मजुराचं हॉटस्पॉट
Sharad Pawar : एक्झिट पोलचा लोड घेऊ नका; ऑनलाईन बैठकीत शरद पवारांनी उमेदवारांना महाविकास आघाडीचा थेट आकडाच सांगितला!
एक्झिट पोलचा लोड घेऊ नका; ऑनलाईन बैठकीत शरद पवारांनी उमेदवारांना महाविकास आघाडीचा थेट आकडाच सांगितला!
मुंबईतील सर्वात धक्कादायक निकाल; वर्सोव्यात ठाकरेंचा मुस्लीम उमेदवार जिंकणार, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
मुंबईतील सर्वात धक्कादायक निकाल; वर्सोव्यात ठाकरेंचा मुस्लीम उमेदवार जिंकणार, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Embed widget