मुंबईतील सर्वात धक्कादायक निकाल; वर्सोव्यात ठाकरेंचा मुस्लीम उमेदवार जिंकणार, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Mumbai Election Exit Poll: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक संस्थांनी आपापले एक्झिट पोल जाहीर केले. पण, त्यातल्या त्यात प्रजातंत्रचा एक्झिट पोल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
Mumbai Vidhan Sabha Election 2024: राज्यात विधानसभा निवडणुकांची (Vidhan Sabha Election 2024) चुरस रंगल्याचं पाहायला मिळत आहे. यंदा राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी (Maha Vikas Aaghadi) यांच्यात मुख्य लढाई पाहायला मिळणार आहे. अशातच अटी-तटीच्या लढतीत राज्याच्या चाव्या कुणाकडे जाणार? याचा निकाल काही तासांतच स्पष्ट होणार आहे. पण त्याआधीच काही संस्थांनी एक्झिट पोल्सचे (Maharashtra Exit Poll 2024) निकाल जाहीर केले आहेत. एक्झिट पोलच्या निकालांनुसार, महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात काँटे की टक्कर होणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक संस्थांनी आपापले एक्झिट पोल जाहीर केले. पण, त्यातल्या त्यात प्रजातंत्रचा एक्झिट पोल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या एक्झिट पोलनुसार राज्यात महाविकास आघाडीची (Mahavikas Agahdi) सत्ता येऊ शकते, असा अंदाज आहे.
प्रजातंत्रच्या एक्झिट पोलनुसार, राज्याच्या सत्तेच्या चाव्या महाविकास आघाडीच्या ताब्यात जातील, तर महायुतीला (Mahayuti) फक्त 127 जागांवर समाधान मानावे लागू शकतं. सध्या राजकीय वर्तुळात प्रजातंत्रच्या एक्झिट पोलमुळे खळबळ माजली आहे.
मुंबईतून 'या' उमेदवारांच्या गळ्यात पडणार आमदारकीची माळ?
जोगेश्वरी पूर्व : अनंत नर, शिवसेना ठाकरे गट
वर्सोवा : हारुन खान, शिवसेना
अंधेरी पूर्व : मुरजी पटेल, शिंदे गट
शिवडी : अजय चौधरी, शिवसेना ठाकरे गट
मुंबादेवी : अमीन पटेल, काँग्रेस
महाड : स्नेहल जगताप, शिवसेना ठाकरे गट