(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Underwater Tunnel: अंडरवॉटर मेट्रोनंतर देशाच्या अर्थिक राजधानीत तयार होणार पहिला अंडरवॉटर टनल
मुंबईचा पाण्याखालील बोगद्यामुळे वेळेची बचत देखील होणार आहे. गिरगाव ते वरळी हा 45 मिनिटांचा प्रवास अवघ्या 10 मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. किंबहुना हा कोस्टल रोड प्रकल्पाचाच एक भाग आहे.
Mumbai Underwater Tunnel: भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा (Underwater Tunnel) देशाची आर्थिक राजधानी मुंबईत तयार होणार आहे. भारतातला पहिला समुद्राखालचा बोगदा नोव्हेंबरमध्ये सुरु होणार आहे. मुंबईत कोस्टल रोड प्रकल्पातला हा समुद्राखालच्या बोगद्याचा महत्त्वाचा टप्पा आहे. हा टप्पा लवकरच पूर्ण होणार आहे. मरीन ड्राईव्ह ते बांद्रा वरळी सीलिंक या टप्प्यातला हा समुद्राखालचा बोगदा आहे. हे खोदकाम करण्यासाठी चिनी बनावटीचं टनेल बोअरिंग मशीन वापरण्यात आलं. गिरगावजवळ हा बोगदा सुरु होतो अरबी समुद्र, गिरगाव चौपाटी, मलबार हिल यांखालून जात ब्रिजकँडी रुग्णालयाजवळ तो संपतो.
मुंबईचा पाण्याखालील बोगद्यामुळे वेळेची बचत देखील होणार आहे. गिरगाव ते वरळी हा 45 मिनिटांचा प्रवास अवघ्या 10 मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. किंबहुना हा कोस्टल रोड प्रकल्पाचाच एक भाग आहे. बोगद्याचा व्यास 12.19 मीटर असून तो समुद्रसपाटीपासून 17-20 मीटर खाली आहे. एक किमीचा भाग समुद्राखाली आहे.
बोगद्याच्या आत क्रॉस पॅसेज असणार आहेत. चार पादचाऱ्यांसाठी आणि दोन वाहनधारकांसाठी आहे. प्रत्येक बोगद्यात 3.2 मीटरच्या तीन लेन आहेत. त्याच्या तयारीसाठी चायना रेल्वे कन्स्ट्रक्शन हेवी इंडस्ट्री कंपनी लिमिटेड (CRCHI) चे सहकार्य घेण्यात आले आहे. 'मावळा' टनेल बोअरिंग मशीनने हे महाबोगदे खोदले जाणार आहेत महाबोगदा तयार करण्याचं काम मुंबई महापालिकेने हाती घेतलं आहे. एवढं मोठं काम हाती घेणारी मुंबई महापालिका एकमेव पालिका आहे. हे बोगदे खोदण्यासाठी मावळा आणला आहे.
या कोस्टल रोड प्रकल्पासाठी एकूण किंमत 12,700 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहर आणि उपनगरातील वाहतुकीला नवी दिशा मिळणार आहे. कोस्टल रोड प्रकल्पाचे दक्षिण आणि उत्तर भाग वेगळे करण्यात आले आहेत. प्रकल्पाचे दक्षिण भागातील 70 टक्क्यांहून अधिक काम झाले आहे.
कोलकाता मेट्रोनं रचला इतिहास; देशात पहिल्यांदाच धावली 'अंडरवॉटर मेट्रो'
देशभरातील वाहतुकीसाठी प्रभावी ठरत असलेली मेट्रो देशात पहिल्यांदाच पाण्याखालून धावली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी कोलकातामधील (Kolkata) ही अंडरवॉटर मेट्रोची चाचणी (Underwater Metro Test) केली जाणार होती. परंतु ही चाचणी अनपेक्षितपणे रद्द करण्यात आली होती. अखेर बुधवारी ही चाचणी यशस्वीपणे पार पडली. बुधवारी इतिहास रचत कोलकाता मेट्रोनं देशात प्रथमच नदीखाली बांधलेल्या बोगद्यातून मेट्रोची चाचणी पूर्ण केली. हुगळीच्या अंतर्गत कोलकाता ते हावडा यादरम्यान करण्यात आलेल्या मेट्रोच्या ट्रायल रनमध्ये फक्त अधिकारी आणि अभियंतेच होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या :