एक्स्प्लोर

नवी मुंबईतील मोरबे धरणाची उंची वाढवा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश

मुंबई मनपाच्या मालकीचे असलेल्या मोरबे धरणाची उंची वाढवून जादा पाणी साठा कसा होईल याची काळजी घ्यावी अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांना दिले आहेत.

नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील  लोकसंख्या सध्या  15 लाख आहे. या ठिकाणची लोकसंख्या वाढीचा वेग तब्बल 60 टक्के आहे. इतर शहरात तो 10 टक्यापर्यंत असतो. त्यामुळे वाढती लोकसंख्या पाहता भविष्यात पाणी प्रश्न निर्माण होवू शकतो. यावर आताच विचार करून महानगर पालिकेने पावले उचलण्याची गरज आहे. यासाठी मनपाच्या मालकीचे असलेल्या मोरबे धरणाची उंची वाढवून जादा पाणी साठा कसा होईल याची काळजी घ्यावी अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांना दिले आहेत. नवी मुंबई शहराचा आढावा घेण्यासाठी आज अजित पवार महानगर पालिकेत आले होते. 

गेल्या दीड महिन्यात अजित पवार यांचा नवी मुंबईत तिसरा दौरा आहे. यामध्ये पवार यांनी महानगरपालिका, सिडको , पोलीस, एमआयडीसी विभागांची झाडाझडती घेतली. यावेळी रायगडचे खासदार सुनिल तटकरे, मनपा आयुक्त अभिजीत बांगर, पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग उपस्थित होते. महानगर पालिका प्रशासनाने केलेल्या कामाची माहिती पवार यांनी घेतली असता भविष्यात शहरासाठी अनेक समस्या भेडसावणार असल्याचे लक्षात आले. यामध्ये मुख्य समस्या पाण्याची असून यावर मनपा प्रशासनाने त्वरीत काम सुरू करावे असे आदेश अजित पवार यांनी दिले आहेत. शहराची वाढती लोकसंख्या पाहता मोरबे धरणाची उंची वाढविण्याबरोबर खोपोली येथील  टाटा विज प्रकल्पातून निघणार्या पाण्यावर बंधारा बांधणे, हेटवणे धरणातील 50 एमएलडी पाणी मिळवण्याबाबत पावले उचलावीत अशा सूचना पवार यांनी दिल्या आहेत. 

लोकांकडून मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ केली जाते.  किंवा आर्थिक स्थिती योग्य नसल्याने मालमत्ता कर भरण्यास उशीर केला जातो. त्यामुळे यावर 24 टक्यांपर्यंत व्याज वसूल केले जाते. यावर सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला असून मालमत्ता करावर लागणारा दंड १२ टक्क्यांच्या खाली असावा अशा सुचना राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाना दिल्या असल्याचे अजितदादांनी सांगितले. नवी मुंबई शहरात महानगर पालिका कडून प्रत्येक नोड मध्ये हाॅस्पीटलच्या सुसज्ज इमारती उभ्या आहेत. त्यामुळे राज्य सरकार कडून या ठिकाणी पीजी मेडिकल काॅलेज आणि नर्सिंग कोर्स सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना स्वस्तातले शिक्षण मिळून मनपा रूग्णालयासाठी डाॅक्टर उपलब्ध होतील. 

नवी मुंबई शहरातील प्रदूषणावर विशेष लक्ष देत पर्यावरण पूरक निर्णय घेण्यावर मनपाने लक्ष केंद्रीत करावे. यासाठी 
नवी मुंबई मनपा परिवहन सेवेत सध्या इलेक्ट्रीक बस असून भविष्यात सर्व बस इलेक्ट्रीकवर करण्याचे आदेश मनपा आयुक्तांना देण्यात आले आहेत. हाॅटेल मधून निघणार्या ओल्या कचर्यावर प्रक्रिया करून गॅसची निर्मिती करीत तो गॅस सीएनजी बससाठी वापरावा. 
शहरात पर्यावरणावर काम करताना विदेशी झाडे लावण्यापेक्षा स्थानिक झाडांना प्राधान्य देण्यात यावेत. जेणे करून वादळवार्यात झाडे उन्मळून पडणार नाहीत. 

शहरातील पार्किंग समस्या मोठ्या प्रमाणात असून यापुढे तयार होणार्या घरांना पार्किंग बंधनकारक करावे. यामध्ये वन बीएचकेला 1 , टू बीएचकेला 2 , तर थ्री बिएचकेला 3 पार्किंग राखून ठेवण्याचा निर्णय घ्यावा. त्याच बरोबर लोकांना स्वस्तात भाजीपाला उपलब्ध होण्यासाठी फिरत्या मोबाईल भाजीपाला गाडीला परवानगी देण्यात यावी. अशा महत्वपुर्ण सुचना अजित पवार यांनी नवी मुंबई महानगर पालिका प्रशासनास दिल्या आहेत. 

निवडणुकीत महाविकास आघाडी करण्याबाबत  अद्याप निर्णय नाही

येत्या काही महिन्यात मुंबई महानगरपालिकाबरोबर नवी मुंबई , औरंगाबाद, कल्याण डोंबिवली , वसईविरार, कोल्हापूर आदी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा, नगरपालिकांच्या निवडणूका होणार आहेत. मात्र या निवडणूका शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस , काँग्रेस महाविकास आघाडी करून लढविण्याबाबत कोणताही निर्णय अजून तरी झालेला नाही.  त्या ठिकाणच्या स्थानिक कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्या नंतर पुढील निर्णय घेणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा 11  डिसेंबर 2024 : 07 PM ABP MajhaZero Hour PM Modi With Raj Kapoor Family : राज कपूर यांच्या आठवणीत रमले पंतप्रधान नरेंद्र मोदीZero Hour MVA Internal Issue : मविआतील संघर्षावर नागपूरकरांना काय वाटतं?Zero Hour MVA in BCM Election : पालिकेआधी मविआ फुटणार? उद्धव ठाकरेंचा मेगाप्लॅन कोणता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
Bangladesh BNP Protest : बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
Pushpa 2: The Rule : 'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
Embed widget