एक्स्प्लोर
Advertisement
नोटाबंदी: आयकर विभागाचा आता नागरी अर्बन बँकांकडे मोर्चा
पंढरपूर: नोटाबंदीच्या निर्णयानंतर जिल्हा बँकांवर केंद्र सरकारने घातलेल्या निर्बंधामुळे मोठे वादळ निर्माण झाले होते. त्यातच अनेकांनी अवैधपणे नागरी बँकांमध्ये जाऊन जुन्या नोटा बदलून घेतल्या. त्यामुळे आता आयकर विभागानं आपला मोर्चा नागरी बँकांकडे वळवला आहे. आयकर विभागाकडून पंढरपूर अर्बन बँकेची सलग दोन दिवस तपासणी करण्यात आली.
10 नोव्हेंबरपासून नागरी बँकांमध्ये नेमका कोणी आणि किती पैसा जमा केला याची चौकशी आयकर विभागाकडून करण्यात आली. यामध्ये बँकेमध्ये जमा झालेल्या एक एका रुपयाचा हिशेब यावेळी घेण्यात आल्याचं समजतं आहे.
पंढरपूर अर्बन बँकेची स्थापना 1912 साली झाली. बँकेची जवळपास 2 हजार कोटींची उलाढाल असल्याने बँकेचा व्याप मोठा आहे.
दरम्यान, आयकर विभागाकडून यासंदर्भात कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तर ही रुटीन तपासणी असल्याचं पंढरपूर आर्बन बँकेच्या वतीनं सांगण्यात येत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement