एक्स्प्लोर

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.46 पर्यंत राहण्याची शक्यता, पगार किती रुपयांनी वाढणार?

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष, सदस्य आणि सचिवांची निवड मागील आठवड्यात केंद्र सरकारनं केली. आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी 18 महिन्यात केंद्र सरकारला मिळणार आहेत.

नवी दिल्ली : केंद्र सरकारनं गेल्या आठवड्यात आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्ष, सदस्य आणि सचिवांच्या नावाची घोषणा केली. याशिवाय आठव्या वेतन आयोगासाठी संदर्भ अटी देखील निश्चित करण्यात आल्या. आयोगाला केंद्र सरकारला अहवाल सादर करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावाधी देण्यात आला आहे. केंद्र सरकारनं आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्ष म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांची निवड केली आहे. केंद्र सरकारला आठव्या वेतन आयोगाच्या कडून शिफारशी सादर केल्या जाणापूर्वी विविध घटकांशी चर्चा केली जाईल. 

8th Pay Commission : 8 व्या वेतन आयोगात मूळ वेतन किती वाढणार?

केंद्र सरकारनं आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींचा अहवाल सादर करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. आता केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचं लक्ष आठव्या वेतन आयोगाचा फिटमेंट फॅक्टर काय असणार याकडे लक्ष लागलं आहे. 

कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटास अँड एम्बिट कॅपिटल यांच्या रिसर्च रिपोर्टनुसार फिटमेंट फॅक्टर 1.8 ते 2.46 असू शकतो. त्यानुसार केंद्र सरकारच्या लेव्हल 1 च्या कर्मचाऱ्यांचं मूळ वेतन किती वाढणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. फिटमेंट फॅक्टर 1.8 ग्राह्य धरल्यास लेवल 1 च्या कर्मचाऱ्यांचं मूळ वेतनं 18000 हजार रुपयांवरुन 32400 रुपये हऊ शकतं.  या सूत्रानुसार मूळ वेतन 80 टक्क्यांनी वाढेल. त्याचवेळी महागाई भत्ता शून्य होईल. जेव्हा नव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी होते तेव्हा महागाईचा विचार केलेला असतो त्यामुळं महागाई भत्ता शून्यावर आणला जातो. सध्या महागाई भत्ता 58 टक्के आहे. त्याशिवाय घरभाडे भत्ता देखील दिला जातो. केंद्राच्या लेव्हल 1 च्या कर्मचाऱ्यांचा पगार29000 रुपये आहे. त्यात मूळ वेतन आणि घरभाडे भत्ता मिळून किती वाढ होते ते पाहावं लागेल. 

एम्बिट कॅपिटलच्या अंदाजानुसार फिटमेंट फॅक्टर 1.82 निश्चित झाल्यास पगार 14 टक्क्यांनी वाढू शकतो. फिटमेंट फॅक्टर 2.15  निश्चित केल्यास 34 टक्के पगार वाढू शकतो. याशिवाय जर फिटमेंट फॅक्टर 2.46 टक्के असल्यास मूळ वेतन 54 टक्क्यांनी वाढू शकते. 

आठव्या वेतन आयोगाचा फिटमेंट फॅक्टर 1.82  ग्राह्य धरल्यास लेव्हल 1 च्या कर्मचाऱ्यांचं मूळ वेतन 18000 रुपयांवरुन  32760 रुपयांवर पोहोचेल. तर, फिटमेंट फॅक्टर 2.15 पकडल्यास मूळ वेतन 18 हजारांवरुन 38700 रुपयांवर पोहोचले. याशिवाय फिटमेंट फॅक्टर 2.46  निश्चित झाल्यास मूळ वेतन 44280 असू शके. 

आठव्या वेतन आयोगाकडून केंद्र सरकारला 18 महिन्यात शिफारशी सादर केल्या जातील. त्यानंतर त्या शिफारशी केंद्र सरकारकडून स्वीकारल्या जाऊन त्याची अंमलबजावणी केली जाईल. आठवा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू केला जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या लेव्हल 1 मध्ये  शिपाई, अटेंडट, सहायक या सारख्याकर्मचाऱ्यांचा समावेश असतो.

महत्त्वाच्या बातम्या

Sugar Prices News : साखरेच्या दरात गेल्या 24 तासात पुन्हा ऐतिहासिक वाढ; ऐन सणासुदीच्या काळात गोडवा कमी होण्याची शक्यता, आजचे दर किती?
साखरेच्या दरात गेल्या 24 तासात पुन्हा ऐतिहासिक वाढ; ऐन सणासुदीच्या काळात गोडवा कमी होण्याची शक्यता, आजचे दर किती?
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Pune Crime: राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
Embed widget