एक्स्प्लोर
Women's World Cup 2025 विश्वविजेत्या जेमिमा रोड्रिग्सच्या कुटुंबीयांसोबत बातचित,कसं होतं सेलिब्रेशन?
ICC महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत (ICC Women's ODI World Cup) भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला असून, संघाची मधल्या फळीतील फलंदाज जेमिमा रॉड्रिग्जच्या (Jemimah Rodrigues) कुटुंबीयांशी एबीपी न्यूजने संवाद साधला. 'हिंमत नाही हारना है, टूटना बिल्कुल नहीं है। जो भी होगा, बस तुम लडते रहना और जीत तो हमारी होनी है,' अशा शब्दांत जेमिमाच्या आई लविता रॉड्रिग्ज यांनी तिला सामन्यापूर्वी प्रोत्साहन दिले होते. जेमिमाचे वडील इव्हान रॉड्रिग्ज यांनी या विजयाचे श्रेय केवळ जेमिमालाच नाही, तर संपूर्ण टीमला दिले आहे. दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, आणि ऋचा घोष यांच्या कामगिरीचेही त्यांनी कौतुक केले. उपांत्य फेरीतील हरमनप्रीत कौरची खेळी मोलाची ठरल्याचे ते म्हणाले. एका कठीण काळातून जात असताना जेमिमाच्या आईने तिचा आत्मविश्वास वाढवला, ज्यामुळे उपांत्य सामन्यात तिने दमदार पुनरागमन केले. हा विजय संपूर्ण देशासाठी आनंदाचा क्षण असल्याची भावना तिच्या वडिलांनी व्यक्त केली.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

















