Palghar Farmer News: भात पिकाच्या नुकसानापोटी फक्त 2 रूपये 30 पैशांची भरपाई, सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळले मीठ, पालघरमधील प्रकार
Palghar Farmer News: सोन्यासारखे आलेले भात पीक अद्यापही शेतात पडून आहे. त्यावर पाणी साचल्याने भाताला कोंब फुटले आहे. हजारो हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले असून त्यावर सरकार ही बुक्क्यांचा मार देत आहे.

Palghar Farmer News: पालघर जिल्ह्यात परतीच्या पावसाने (Palghar Farmer News) थैमान घातले असून हाता तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला आहे. सोन्यासारखे आलेले भात पीक अद्यापही शेतात पडून आहे. त्यावर पाणी साचल्याने भाताला कोंब फुटले आहे. हजारो हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले असून त्यावर सरकार ही बुक्क्यांचा मार देत आहे. शिल्लोत्तर येथील एका शेतकऱ्याला चक्क नुकसान भरपाई म्हणून फक्त 2 रूपये 30 पैसे बँक खात्यात जमा झाल्याने शेतकरी तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.
वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबाधले जाते. वाडा कोलम हा भाताचा वाण राज्यभर प्रसिद्ध असून त्याला बाजारपेठेत चांगली मागणी आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने भातपीक चांगले आले होते. सोन्यासारखे पीक आल्याने शेतकरी आनंदात होता. मात्र परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची पुरती निराशा झाली. सोन्यासारखे भातपीक अक्षरश मातीमोल झाले. परतीच्या सततच्या पावसाने भातपीकाला झोडपून काढले कापणीस आलेले भातपीक शेतात पडले. त्यावरून पाणी वाहून गेले. अनेक दिवसात पीक पाण्यात राहिल्याने आता भाताला कोंब आले आहेत. भाताबरोबर पेंढाही काळा पडल्याने जनावरेही हा पेंढा खाणार नसल्याने त्यांच्यावरही उपासमारीची वेळ येणार आहे.
भात पिकाच्या नुकसानापोटी फक्त 2 रूपये 30 पैशांची भरपाई- (Palghar Farmer News)
सरकारकडून नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्यात आले. त्यानंतर काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली. वाडा तालुक्यातील शिल्लोत्तर येथील शेतकरी मधुकर बाबुराव पाटील या शेतक-याची एकूण जमीन 11 एकर आहे. त्यांच्या नावावर सात एकर पत्नी व मुलीच्या नावे चार एकर अशी एकूण जमीन असताना पाटील त्यांना नुकसान भरपाई पोटी सरकारकडून 2 रूपये 30 पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा झाले. सरकारकडून नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्यात आले. त्यानंतर काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली. वाडा तालुक्यातील शिल्लोत्तर येथील शेतकरी मधुकर बाबुराव पाटील या शेतकऱ्याची एकूण जमीन 11 एकर आहे. त्यांच्या नावावर सात एकर पत्नी व मुलीच्या नावे चार एकर अशी एकूण जमिन असताना पाटील त्यांना नुकसान भरपाई पोटी सरकारकडून 2 रूपये 30 पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा झाले त्यानंतर गेल्या शुक्रवारी त्यांच्या मोबाईलवर मेसेज गेल्यावर तर त्यांना धक्काच बसला. लाखो रूपये नुकसान झाले असताना फक्त 2 रूपये 30 पैसे नुकसान भरपाई देऊन त्यांच्या जखमेवर मीठ चोळले असल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून सरकारवर रोष व्यक्त केला आहे.
























