ओव्हरटेक करण्यावरुन वाद, थेट चाकूहल्ला, पोलिसांनी बाजी लावून दोघांचे प्राण वाचवले
कोळसेवाडी पोलिसांनी प्रसंगावधान आणि धाडसाच्या जोरावर दोन व्यक्तींचा जीव वाचवला आहे.
कल्याण : अगदी सिनेमांतील एखादा सीन वाटावा अशी घटना कल्याण पूर्वे येथे घडली आहे. कल्याणच्या कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत काटेमानेवली नाका ते चिंचपाडा रोडवर कर्तव्य बजावणाऱ्या 3 पोलिसांनी धाडस आणि प्रसंगावधान दाखवत चाकू हल्ल्यातून दोघा जणांचे प्राण वाचवले आहेत. पोलिसांनी जीवाची पर्वा न करता मोठ्या धाडसाने हल्लेंखोरांच्या तावडीतून दोघांना वाचवलं आहे. अटक करण्यात आलेल्याचे नाव मयूर रामदास दराडे असे असून जखमी तरुणांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. क्षुल्लक कारणावरुन हा वाद झाल्याचे समोर आले आहे.
अमली पदार्थ तस्करी प्रकरणी NIA ने ताब्यात घेतलेल्या आरोपीचा नांदेड कारागृहात मृत्यू
चोर समजून पायी जाणाऱ्या मजुराला जमावाची मारहाण, नांदेडमधील घटना
"काय गं कुसूम, मुंबईला कशी?" नावं लक्षात ठेवण्याचा भन्नाट किस्सा शरद पवारांनी सांगितला!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha