(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चोर समजून पायी जाणाऱ्या मजुराला जमावाची मारहाण, नांदेडमधील घटना
नांदेड जिल्ह्यातील चोऱ्यांचे सत्र सुरू असल्याने गाव पातळीवरील जनता भयभीत झाली आहे. त्यामुळे गावातील तरुणांनी 'आपलं गाव आपली सुरक्षा' म्हणत एकत्र येत रात्रीला गस्त घालण्यास सुरूवात केली आहे.
नांदेड : बस बंद असल्याने पायी प्रवास करणाऱ्या मजुराला चोर समजून जमवाने जबर मारहाण केली आहे. नांदेड जिल्ह्यातील कुपटी सोनपेठ येथे ही घटना घडली आहे. जितेंद्र आसाराम पळसे (रा. मध्यप्रदेश. ता. अरिया, जि. कमोल ) असे मारहाण झालेल्या तरूणाचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नांदेड जिल्ह्यातील विविध भागांमध्ये चोऱ्यांचे सत्र सुरू असल्याने गाव पातळीवरील जनता भयभीत झाली आहे. त्यामुळे गावातील तरुणांनी 'आपलं गाव आपली सुरक्षा' म्हणत एकत्र येत रात्रीला गस्त घालण्यास सुरूवात केली आहे. पण या गोष्टीची भरपाई नको त्यालाच भरावी लागली आहे. तरूण गस्तीवर असताना त्यांना कोणीतरी चालत जात असल्याचे दिसले. त्यामुळे तरूणांनी त्याला बेदम मारहाण केली.
घटनेची माहिती इस्लापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर डेडवाल यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व मजुराचा जीव वाचवला. संबंधित अनोळखी तरुणास ताब्यात घेऊन चौकशी केली असता, हा तरुण मध्यप्रदेशातील असून तो कामाच्या निमित्ताने तेलंगणातून महाराष्ट्रात येत होता.
एसटी बस बंद असल्यामुळे काल तो पायी येत होता. चोर असल्याचे समजून कुपटी व सोनपेठ येथील गावातील लोकांनी त्याला माहणाह केली.
ज्या पद्धतीने ग्रामीण भागात चोऱ्या वाढल्या आहेत त्याच प्रमाणे गेल्या एक महिन्यापासून ग्रामीण भागाची रक्त वाहिनी समजली जाणारी बसही बंद आहे. त्यामुळे ग्रामीण भागात प्रवास करण्यासाठी सर्वसामान्य, मजूर यांना साधन उरले नाही. त्यामुळे रोजगाराच्या शोधात भटकत निघालेल्या मजुरांना रात्री बे रात्री वाहन नसल्यामुळे पायी प्रवास करावा लागत आहे. परंतु, या पायी प्रवासात त्यांना काही कटू अनुभवातून जावे लागत आहे. नांदेड जिल्ह्यातील कुपटी सोनपेठ येथे चोर समजून एका पायी प्रवास करणाऱ्या मजुरास जमावाने जबर मारहाण केली आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
इतर महत्वाच्या बातम्या
अमली पदार्थ तस्करी प्रकरणी NIA ने ताब्यात घेतलेल्या आरोपीचा नांदेड कारागृहात मृत्यू
"काय गं कुसूम, मुंबईला कशी?" नावं लक्षात ठेवण्याचा भन्नाट किस्सा शरद पवारांनी सांगितला!