Bacchu Kadu: मंत्रीमंडळात अर्ध्याहून अधिक मंत्री आका, फडणवीस मोठे आका, मोदी मणिपूरला गेले हा नेपाळचा परिणाम; बच्चू कडूंचा सडकून 'प्रहार'
Bachchu Kadu on Devendra Fadnavs: मंत्रीमंडळामधील अर्ध्याहून अधिक मंत्री आका असून देवेंद्र फडणवीस हे मोठे आका आहेत, अशा शब्दात बच्चू कडू यांनी हल्लाबोल केला.

Bachchu Kadu on Devendra Fadnavs:पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटनेनंतर अडीच वर्षानी दौऱ्यावर गेले हा नेपाळचा परिणाम आहे. मोदी यांना भीती वाटत आहे की आपलं घर जळू नये. स्वतःच्या घरावर वेळ आली तेव्हा मणिपूरची आठवण आली आहे दुसरं काही नाही असा सडडून प्रहार संघटनेचे प्रमुख माजी आमदार बच्चू कडू यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील बच्चू कडून यांनी हल्लाबोल केला. मंत्रीमंडळामधील अर्ध्याहून अधिक मंत्री आका असून देवेंद्र फडणवीस हे मोठे आका आहेत, अशा शब्दात बच्चू कडू यांनी हल्लाबोल केला.
काही मंत्री फक्त पैसे कमवण्यासाठीच मंत्रीपद घेतात
बच्चू कडू म्हणाले की, पीक विम्याचे निकष बदलले आहेत, या प्रश्नावर बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी सांगितले की, राज्याच्या मंत्रिमंडळात अर्ध्याहून अधिक मंत्री आका आहेत तर फडणवीस मोठे आता आहेत. शेतकऱ्यांनी पिक विमा काढू नये, गुजरातमध्ये या कंपन्या फिरकत सुद्धा नाहीत. पिक विमा कंपन्या फसव्या आहेत असे कडू म्हणाले. या देशामध्ये भ्रष्टाचार करण्याची स्पर्धा लागली आहे. काही मंत्री फक्त पैसे कमवण्यासाठीच मंत्रीपद घेतात, सर्वांचे मोठे आका देवेंद्र फडणवीस आहेत असे कडू म्हणाले.
छातीवर गोळ्या झेलू पण शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही
दरम्यान, छातीवर गोळ्या झेलू पण शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. वाई गोरक्षनाथ (ता. वसमत) येथे बच्चू कडू म्हणाले की, शक्तिपीठ महामार्गांची मागणीच कोणी केली नाही. त्यानंतरही सरकार महामार्ग बांधण्याच्या तयारीत आहे. मात्र वेळप्रसंगी छातीवर गोळ्या झेलू पण हा महामार्ग होऊ देणार नाही. पवनार ते पत्रा देवी या 802 किलोमीटरच्या शक्तिपीठ महामार्गांची कोणीही मागणी केली नाही. शेतकऱ्यांची मागणी नसताना हा महामार्ग मंजूर करून शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जात आहेत. मात्र, या महामार्गाला आमचा विरोध आहे. सरकारने या महामार्गाचे काम सुरु करू नये अन सुरु केलेच तर काम बंद करून वेळप्रसंगी गोळ्या झेलण्याची आमची तयारी असल्याचा इशारा कडू यांनी यावेळी दिला.
बच्चू कडू सध्या शेतकरी शेतमजूर हक्कयात्रा काढत आहेत. जिल्हानिहाय दौऱ्यावेळी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध प्रश्नावरुन बच्चू कडू हे आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनो, आपण पेटून उठूया. आपल्या हक्कासाठी लढूया असं आवाहन ते करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
























