"आता ते मौलाना कुठे आहेत ज्यांना उद्धव ठाकरेंना मदत .." विशाळगड हिंसाचाराप्रकरणी इम्तियाज जलील यांनी सुनावले..
Imtiaz Jaleel on Vishalgad Encrachment: विशाळगड हिंसाचाराप्रकरणी इम्तियाज जलील यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. असल्या हिंसक घटनांना तुम्ही पुढाकार घेता हे दुर्दैवी असल्याचे जलील म्हणाले.
![Imtiyaj Jalil on Vishalgad Encrachment criticises Maulana who wants to vote Uddhav Thakeray](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/15/51585349515ee831c0102a3f4937596617210358150941063_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
शाहू महाराजांचे वंशज नेतृत्व करत असताना आता कोणं हिंसा करतंय? असा म्हणत, आम्ही तुमचा आदर करतो मात्र असल्या हिंसक घटनांना तुम्ही पुढाकार घेता हे दुर्दैवी असल्याचे जलील म्हणाले.
विशाळगड अतिक्रमण आंदोलनाला हिंसक वळण
विशाळगडावरील अतिक्रमण मुक्ती आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने विशाळगड परिसरातील वाहनांची तोडफोड तसेच जाळपोळ झाल्याची घटना घडली. या घटनांचे काही व्हिडिओही समोर आले असून विशाळगडावरील स्थानिकांनी मारहाण केल्याचा आरोप केला. या संपूर्ण प्रकारामुळे तिथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान या घटनेवर इम्तियाज जलील यांनी तीव्र शब्दात टीका केली आहे.
लोकसभेत जाऊन अशी परतफेड,जलील यांचा संताप
आम्ही तुम्हाला मतदान केले म्हणून तुम्ही लोकसभेत गेलात. आणि आता मुस्लिम समाजाची अशी परतफेड करत आहात असे जलील म्हणाले. मुस्लिम समाजाच्या घरात घुसून जाळपोळ करण्यात आला. कोण हिंसा करतंय?शाहू महाराजांचे वंशज नेतृत्व करतात. असे म्हणत त्यांनी खडे बोल सुनावले. आम्ही तुमचा आदर करतो मात्र असल्या हिंसक घटनांना तुम्ही पुढाकार घेता दुर्दैवी आहे, जे पुस्तक महाराज तुम्ही मला दिले ते तुम्ही आता वाचा, आम्ही तुम्हाला मतदान केले म्हणून तुम्ही लोकसभेत गेले, असे म्हणत इम्तियाज जलील यांनी संताप व्यक्त केला.
हे घडत असताना कोल्हापूर पोलीस आपली ड्युटी करत नसून बघ्याची भूमिका घेत होते असा आरोप त्यांनी केला. अतिक्रमण काढण्याचे काही नियम असतात, पण हा गुंडाराज चालला आहे का असा खडा सवाल त्यांनी केला.
विशाळगड आणि विशाळगडच्या पायथ्याशी दोन वेगवेगळी आंदोलन
पोलिसांकडून 500 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांच्य तपासामध्ये आणखी काही नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आणखी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. दरम्यान, काल विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी पुण्याच्या रवींद्र पडवळ यांच्या नेतृत्वात आणि संभाजी राजे छत्रपती यांच्या नेतृत्वात विशाळगड आणि विशाळगडच्या पायथ्याशी दोन वेगवेगळी आंदोलन झाली होती. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं आणि ज्यांचा गडावरील अतिक्रमणाशी काही सुद्धा संबंध नाही अशा लोकांच्या घरांवर हल्ले करण्यात आल्यानंतर प्रापंचिक साहित्याचे नुकसान करण्यात आल्याने संताप निर्माण झाला आहे. दरम्यान, पोलीस तपासामध्ये सीसीटीव्ही आणि इतर रेकॉर्डिंग पाहून गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)