(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महाविकास आघाडीत एका-एका जागेसाठी रस्सीखेच; MIM ला हव्यात 28 जागा; काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दिलेला प्रस्ताव एबीपी माझाच्या हाती
एमआयएमने केवळ शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोनच पक्षांना दिला प्रस्ताव देण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मात्र प्रस्ताव देणे एमआयएमने टाळलं.
छत्रपती संभाजीनगर : राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी (Vidhansabha election) बहुतांश पक्षांकडून हळूहळू उमेदवारांची घोषणा होण्यास सुरुवात झाली आहे. राजकीय वर्तुळात विधानसभेचे वारे वाहत असून सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. एमआयएमने (MIM) एकीकडे महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) सामील होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दिलेल्या प्रस्तावाची एबीपी माझाच्या हाती लागली आहे. मुस्लीमबहुल 28 जागांची यादी सुपूर्द करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीला लेखी प्रस्ताव दिल्याचं एमआयएमच्या वतीने सांगण्यात आलं होतं. एमआयएमच्या वतीने देण्यात आलेला तो प्रस्ताव एबीपी माझाच्या हाती लागला आहे . 10 सप्टेंबरला हा प्रस्ताव देण्यात आला. केवळ शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोनच पक्षांना दिला प्रस्ताव देण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मात्र प्रस्ताव देणे एमआयएमने टाळलं. मुस्लिम बहुल 28 जागांची यादी ही या प्रस्तावासोबत देण्यात आली आहे . आणि या तडजोड करण्याची तयारी असल्याचं जलील यांनी माझाशी बोलताना सांगितलं. गेल्या दोन दिवसात मुंबईत बैठकाही झाल्याचा इम्तियाज जलील यांचा दावा जलील यांनी केला आहे. शिवाय 28 मतदार संघाची मतदारसंघनिहाय यादी एबीपी माझाच्या हाती लागली आहे.
पुणे विभाग - 02
214 पुणे कॅन्टोन्मेंट
249 सोलापूर सेंट्रल
अमरावती विभाग - 05
मराठवाडा - 04
नाशिक -02
- धुळे शहर
- 114 मालेगाव मध्य
सर्वाधिक जागा या मुंबईतून मागितल्या आहेत. एकूण 12 जागांवर एमआयएम विजयी होऊ शकतात असा दावा एमआयएमने प्रस्तावात म्हटले आहे.
मुंबई - 12
- 128 धारावी
- 184 भायखळा
- 186 मुंबादेवी
- 164 वर्सोवा
- 165 अंधेरी वेस्ट
- 168 चांदिवली
- 171 मानखुर्द
- 172 अनुशक्ती नगर
- 174 कुर्ला
- 175 कलिना
- 176 वांद्रे ईस्ट
- 177 वांद्रे वेस्ट
ठाणे आणि कोकण विभाग - 03
- 136 भिवंडी वेस्ट
- 137 भिवंडी ईस्ट
- 149 मुंब्रा कालवा
अशा एकूण 28 जागा एमआयएम बाजी मारू शकतं असा दावा करत प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी प्रस्तावात महाविकास आघाडीला म्हटले आहे. महाविकास आघाडीच्या दोन पक्षाच्या प्रमुख यांना लेखी प्रस्ताव पाठवला होता. ज्या ठिकाणी मुस्लिम ,दलित मतदारसंघ आहे, ज्या राखीव मतदारसंघात मुस्लिम मतदार जास्त आहे आणि जिथे आम्ही जागा जिंकलो आहोत. जिथे आमची चांगली कामगिरी आहे अशा जागांची यादी आम्ही तयार केली आहे, त्यात आम्ही तडजोड करायला तयार आहे. 28 आशा जागा आहे जिथे आम्ही निवडून येऊ शकतात. 28 जागांची लिस्ट तयार आहे त्यात कमी होऊ शकते. आमचा उद्देश एकच आहे. भाजप ज्या पद्धतीने मुस्लिम समाजाला टार्गेट करत आहे, त्यांना धडा शिकवण्याची गरज आहे. निवडणूक आहे काही गोष्टी उघड करता येणार नाही. प्रस्ताव देऊन 15 दिवस पेक्षा दिवस झाले आहे, 10 सप्टेंबर ला प्रस्ताव दिला.त्यातून काही पॉझिटिव्ह निघत आहे..मागच्या दोन दिवस मुंबईत बैठका झाल्या, असेही इम्तियाज जलील म्हणाले.
हे ही वाचा :