तुकाराम मुंढेंना अखेर पोस्टिंग, मानवी हक्क आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती
नागपूर महापालिका आयुक्त पदावरुन पाच महिन्यापूर्वी बदली झाल्यानंतर तुकाराम मुंढे (Tukaram Munde) यांची मुंबईत महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी बदली करण्यात आली होती. पण त्यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वीच त्या ठिकाणी दुसऱ्याच एका अधिकाऱ्याची परस्पर नियुक्ती करण्यात आली होती.
![तुकाराम मुंढेंना अखेर पोस्टिंग, मानवी हक्क आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती IAS Tukaram Munde Posted as new Secretary of State Human Rights Commission तुकाराम मुंढेंना अखेर पोस्टिंग, मानवी हक्क आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/14174729/Tukaram-Mundhe.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: पाच महिन्यापूर्वी नागपूरच्या महापालिका आयुक्त पदावरुन बदली झाल्यानंतर कोणत्याही पदभाराविना असलेल्या तुकाराम मुंढे यांना अखेर नियुक्ती देण्यात आली आहे. त्यांना राज्य मानवाधिकार आयोगाच्या सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
नागपूर आयुक्त पदावरुन बदली झाल्यानंतर त्यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी करण्यात आली होती. पण मुंढे यांनी त्या पदाचा चार्ज घेण्यापूर्वीच त्या ठिकाणी दुसऱ्याच एका अधिकाऱ्याची परस्पर नियुक्ती राज्य शासनाने केली होती. त्यामुळे गेली पाच वर्षे तुकाराम मुंढे हे कोणत्याही पदभाराविना होते.
नागपूरमध्ये आयुक्त म्हणून काम करताना मुंढे यांनी कोणाचीही पर्वा न करता धडाक्याने निर्णय घेण्यास सुरुवात केली होती. नागपूर शहराला आणि महापालिकेच्या प्रशासनाला तुकाराम मुंढे यांनी कडक शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नागपूर महापालिकेचे सत्ताधारी भाजप आणि प्रशासन असा वाद निर्माण झाला होता. त्या वादामुळे अखेर तुकाराम मुंढे यांची बदली मुंबईत राज्य जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी करण्यात आली होती. पण त्या ठिकाणची नियुक्ती प्रलंबित होती.
Human Rights Day 2020: आज आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस; का साजरा केला जातो?
आपल्या धडाकेबाज कामांसाठी प्रसिध्द असलेले तुकाराम मुंढे हे 2005 सालच्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. आतापर्यंत ज्या-ज्या ठिकाणी त्यांची पोस्टिंग झाली आहे त्या ठिकाणी त्यांनी आपल्या कामाची छाप उमटवली आहे. ते ज्या ठिकाणी काम करायचे त्या ठिकाणच्या नागरिकांत त्यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत होतं.
सामान्य लोकांना जरी तुकाराम मुंढेची कार्यशैली आवडत असली तरी सत्ताधारी आणि राजकारण्यांसाठी मात्र ती अडचणीची ठरत असल्याचं दिसत होतं. सत्ताधारी आणि विरोधकही तुकाराम मुंढेच्या विरोधात एकत्र यायचे. परिणामी तुकाराम मुंढेंची बदली व्हायची. असे असले तरी नव्या ठिकाणी रुजू झालेले तुकाराम मुंढेंनी आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमध्ये कोणताही बदल केला नाही हे विशेष.
राज्यातील कारागृहात असलेल्या कैद्यांच्या मानवी अधिकारांचे उल्लंघन; हायकोर्टात याचिका
कोरोना दरम्यान नागपूरमध्ये आयुक्त म्हणून काम करत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती. तुकाराम मुंढेचा सोशल मीडियावर एक खास असा चाहता वर्ग आहे.
तुकाराम मुंढे यांच्यासह काल (13 जानेवारी) चार अधिकाऱ्यांना पोस्टिंग मिळाली. एमपीसीएलचे अतिरिक्त मुख्यसचिव अरविंद कुमार यांना मंत्रालयात मार्केटिंग आणि टेक्स्टाईल विभागात नियुक्ती मिळाली. डी. बी. गायकवाड यांची सार्वजनिक आरोग्य विभागाचे ज्वॉईंट सेक्रेटरी म्हणून तर उदय जाधव यांची राज्य बाल हक्क आयोगाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे
बार्शीत दोन वर्षांपासून खोदून ठेवले रस्ते, नागरिक हैराण, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल
पहा व्हिडीओ: Tukaram Munde | तुकाराम मुंढे राज्य मानव अधिकार आयोगाच्या सचिवपदी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)