एक्स्प्लोर
आंब्याच्या पेटीतून 12 लाखांची लाच, ठाण्यातील IAS अधिकारी अटकेत
ठाणे : ठाण्यात आदिवासी विकास खात्याचे उपायुक्त किरण माळी यांना लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. आदिवासी विकास विभागाचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद गवादे यांनी 12 लाखांची लाच मागितली होती. आंब्याच्या पेटीमधून 12 लाख रुपयांची लाच स्वीकारताना माळींना अटक करण्यात आली आहे. तसंच आयएएस अधिकारी मिलिंद गवादेंनाही अटक करण्यात आली आहे. ठाणे लाचलुचपत विभागाने शनिवारी ही कारवाई केली आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला या आयएएस अधिकाऱ्यांनी लाच मागितल्याची तक्रार मिळाली. त्यानुसार आदिवासी विकास खात्याचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद गवादे यांच्यासाठी सापळा लावण्यात आला होता. मात्र ही 12 लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या किरण माळींना रंगेहाथ पकडण्यात आलं. रात्री उशिरा मिलिंद गवादे यांनाही पोलिसांनी राहत्या घरातून अटक केली आहे.
आदिवासी विकास खात्यातील एका कर्मचाऱ्याकडे पदोन्नतीसाठी 12 लाख रुपयांची लाच देण्याची मागणी गवादेंनी केली होती.
काय आहे प्रकरण?
ठाण्यातील आदिवासी विकास विभागातील 12 कर्मचाऱ्यांची आश्रमशाळांच्या रेक्टरपदी नियुक्ती करण्यात आली होती. अधीक्षक पदावरुन आश्रमशाळांच्या रेक्टरपदी त्यांना काही वर्षांपूर्वी पदोन्नती देण्यात आली होती.
ही पदोन्नती रद्द करण्याची धमकी देत 12 कर्मचाऱ्यांकडून 12 लाखांची लाच आदिवासी विकास खात्याचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद गवादे यांनी मागितली होती. शैक्षणिक पात्रतेअभावी पदोन्नती रद्द करण्याची धमकी देत प्रत्येकी एक लाखांची लाच कर्मचाऱ्यांकडून मागण्यात आली होती.
एका कर्मचाऱ्यानं लाच लुचपत प्रतिबंधक खात्याला याची तक्रार दिल्यावर सापळा रचून लाच स्वीकारणाऱ्या किरण माळी आणि लाच मागणाऱ्या मिलिंद गवादे या दोन्ही आयएएस अधिकाऱ्यांना अटक केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement