एक्स्प्लोर
लॉन्चिंगबद्दल मला कल्पना नव्हती, समजल्यानंतर पायाखालची जमीन सरकली : अमित ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पहिल्या राज्यव्यापी अधिवेशनात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचं लॉन्चिंग झालं आहे. बुधवारी (22 जानेवारी) सायंकाळी 5 वाजता आपल्याला लॉन्चिंगविषयी माहिती मिळाल्याचं अमित ठाकरे यांनी या वेळी सांगितले.
मुंबई : लॉन्चिंगबद्दल मला कल्पना नव्हती, जेव्हा मला कळालं तेव्हा पायाखालची जमीन सरकली, अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी दिली आहे. ठाकरे कुटुंबातील आणखी एक सदस्य सक्रीय राजकारणात सहभागी झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पहिल्या राज्यव्यापी अधिवेशनात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचं लॉन्चिंग झालं आहे. बुधवारी (22 जानेवारी) सायंकाळी 5 वाजता आपल्याला लॉन्चिंगविषयी माहिती मिळाल्याचं अमित ठाकरे यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितले.
अमित ठाकरे म्हणाले, ज्यावेळी मला बाबांनी मला सांगितले त्यानंतर मला खूप टेन्शन आल होतं. काल रात्री मी झोपलो नाही. जेवण देखील केल नाही. घोषणा झाल्यानंतर मी भावुक झालो. माझं भाषण आणि बाबांचं भाषण तुलना होणार याची मला कल्पना होती . त्यामुळे भाषण करण्यापूर्वी जरा प्रेशर आल होतं.
MNS Adhiveshan | आमच्यासाठी हा सुखद धक्का होता, या क्षणाची आम्ही वाट पाहत होतो : शर्मिला ठाकरे
राजकरणात करिअर करायच हे ठरवल होत का? या प्रश्नाचं उत्तर देताना अमित ठाकरे म्हणाले, राजकारणात करिअर करायचं हे ठरवलं. पण, शेवटी पाण्यात पडल्यावर माणूस पोहायला शिकतो. माझ्या स्वत:कडूनच्या अपेक्षा आहे. ग्राउंड लेव्हलपासून मला काम करायचं आहे. मला रुटस् जपायचे आहेत. पडत्या काळात ज्यांनी हात दिला आहे त्यांच्यासोबत पुढे जाणार आहे.
आदित्य ठाकरे, रोहित पवार यांच्यातील स्पर्धेविषयी अमित म्हणाले, 'मला कुणाशी स्पर्धा करायची नाही. मी जनतेची कामं करणार आहे. अनेक महत्वाचे प्रश्न आहे. माझी बाबांसोबत रेस नाही. बाबांशी चर्चा करून पुढील दिशा ठरवणार असल्याचं त्यांनी सांगितले.
गेल्या २ वर्षांपासून अमित ठाकरे मनसेच्या आंदोलनात सहभागी होत आहे. नवी मुंबई मनपा कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी त्यांनी मोर्चाही काढला होता. रेल्वेचे प्रश्न मांडण्यासाठी अधिकाऱ्यांच्या भेटी-गाठी घेतल्या होत्या. आरेतील वृक्षतोडीविरोधातही आवाज उठवला. त्यामुळेच अमित ठाकरेंनी सक्रीय राजकारणात उतरावं अशी सर्वांचीच इच्छा होती.
संबंधित बातम्या :
अमित ठाकरे सक्रीय राजकारणात, मनसेच्या नेतेपदी निवड
महाविकास आघाडी सरकारवर मनसेची नजर, मंत्रिमंडळावर शॅडो कॅबिनेटची नेमणूक करणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
नाशिक
राजकारण
Advertisement