एक्स्प्लोर
मी छोट्या लोकांच्या आव्हानांकडे लक्ष देत नाही, शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला
दुष्काळाच्या उपाययोजनांबाबत 'जाणता राजा' किंवा त्यांच्या पंटरने चर्चेला यावं, असे खुले आव्हान चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांना दिले होते. पाटलांच्या या विधानाचा शरद पवारांनी आज समाचार घेतला.

सातारा : दुष्काळाच्या उपाययोजनांबाबत 'जाणता राजा' किंवा त्यांच्या पंटरने चर्चेला यावं, असे खुले आव्हान चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांना दिले होते. पाटलांच्या या विधानाचा शरद पवारांनी आज समाचार घेतला. शरद पवार म्हणाले की, मी छोट्या लोकांच्या आव्हानांकडे लक्ष देत नाही, मुंबईत बसून व्याख्यान देण्यापेक्षा त्या लोकांनी इथे येऊन दुष्काळाची पाहणी करावी.
शरद पवार सध्या दुष्काळ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान आज त्यांनी साताऱ्यात दुष्काळाच्या परिस्थितीची पाहणी केली. यावेळी पवारांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकारवर सडकून टीका केली.
शरद पवार म्हणाले की, तिथे मुंबईत बसून व्याख्यानं आणि आव्हानं देत बसण्यापेक्षा राज्यभरातील दुष्काळाची पाहणी करावी, तेव्हाच तुम्हाला दुष्काळाची परिस्थिती समजेल. मी दुष्काळाची परिस्थिती पाहण्यासाठी जिथे-जिथे फिरलो आहे. तिथले लोक मला सांगत आहेत की, गावांमध्ये पिण्यासाठीदेखील पाणी नाही. पाणी खूप दिवसांनी येतं. चारा छावण्यांमध्येदेखील खूप कडक नियम आहेत. रोजगार हमी योजनेत लोकांना कामं मिळत नाही.
दुष्काळ दौऱ्यात शरद पवारांच्या शेतकऱ्यांशी संवाद | सातारा | एबीपी माझा
पवार म्हणाले की, दुष्काळ दौऱ्यादरम्यान मी लोकांचे म्हणणे ऐकून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटायला वेळ मागणार आहे. दुष्काळाच्या परिस्थितीच मी घेतलेला आढावा त्यांच्यासमोर मांडणार आहे. त्यांनी या परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजना कराव्या, यासाठी भेट घेणार आहे.
शरद पवारांनी यावेळी मुख्यमंत्र्यांवरही टीका केली. पवार म्हणाले की, मी बातमी वाचली की, मुख्यमंत्री फोनवरुन दुष्काळाचा आढावा घेत आहेत. हे सगळं ठीक आहे, फोनवरुन कोणीही माहिती घेऊ शकतं, परंतु राज्यकर्त्यांनी राज्यभर फिरायला हवं, लोकांमध्ये जायला हवं, तेव्हाच त्यांना इथली परिस्थिती समजेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बातम्या
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
