एक्स्प्लोर

मी भाजप सोडली नाही तर पक्षाने मला बाहेर ढकललं : एकनाथ खडसे

देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील कितीही सांगत असले की, सरकार दोन महिन्यात पडेल चार महिन्यात पडेल. एक वर्ष झालं तरी सरकार पडत नाही, असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलं.

जळगाव : भारतीय जनता पक्ष मी सोडलेला नाही तर पक्षाने मला बाहेर ढकलून दिले आहे. भाजपमध्ये असताना माझा खूप छळ झाला, किती अपमान झाला तरीही मला पक्ष सोडायचा नव्हता. परंतु त्यांनी अशी परिस्थिती निर्माण केली की शेवटी मला पक्ष सोडावा लागला आणि मी बहुजन समाजाच्या या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची युती होऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार हे शक्यच नव्हतं. कुणालाही याबाबत शक्यता वाटत नसताना मात्र शरद पवारांनी हे करून दाखवलं, असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलं.

देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील कितीही सांगत असले की, सरकार दोन महिन्यात पडेल चार महिन्यात पडेल. एक वर्ष झालं तरी सरकार पडत नाही. भारतीय जनता पक्षाचं एकूण संख्याबळ हे 105 असून बहुमतासाठी त्यांना 40 आमदारांची आवश्यकता आहे. म्हणजे कुठला तरी पक्ष त्यांच्यासोबत गेला पाहिजे. परंतु तिन्ही पक्षांपैकी कुठलाही पक्ष हा भाजपसोबत जाण्यास तयार नाही, असंही खडसे यांनी म्हटलं.

भांडण होतील, मतभेद होतील परंतु पाच वर्ष हे सरकार टिकणार

भांडण होतील, मतभेद होतील परंतु पाच वर्ष हे सरकार टिकणार आहे. बत्तीस पक्षाचं सरकार हे अटल बिहारी वाजपेयी यांनी पाच वर्ष चालवलं आहे, हे तर तीन पक्षाचं सरकार आहे. अरे हे सरकार पाच वर्षे टिकणार आहे हे मला कळलं म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलो. भाजपला भीती आहे की आपले 105 आमदारांचे कमी होऊ नये म्हणून आपले आमदार हे दुसऱ्या पक्षात जाऊ नये म्हणून त्यांना टिकवण्यासाठी फक्त त्यांना लहान मुलांसारखे आश्वासन सुरू आहे, असं खडसे म्हणाले.

आपल्याला पक्ष वाढवायचा असेल तर संघटित होऊन काम करावे लागेल. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आणि नगर परिषद, ग्रामपंचायत निवडणुका आणि संघटना बांधणीसाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मह्त्वपूर्ण आढावा बैठक आज आयोजित करण्यात आली होती. यावेळी एकनाथ खडसे बोलत होते. राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची ही पहिलीच बैठक होती. या बैठकीत त्यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत काम करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Embed widget