एक्स्प्लोर
मला पद दादा किंवा ताईंमुळे नाही, शरद पवारांमुळे मिळालं : जयंत पाटील
लोकमत विधीमंडळ पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी नेत्यांना चांगलंच कोंडीत पकडलं. मात्र नेत्यांनीही आपल्या खास शैलीत उत्तर देतं काही प्रश्नांवर षटकार ठोकला.
नागपूर : लोकमत विधीमंडळ पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी नेत्यांना चांगलंच कोंडीत पकडलं. मात्र नेत्यांनीही आपल्या खास शैलीत उत्तर देतं काही प्रश्नांवर षटकार ठोकला. असाच एक प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारण्यात आला.
“जयंत पाटील तुम्हाला प्रदेशाध्यक्ष पद हे दादा मुळे नव्हे तर ताई मुळे मिळाल्याची चर्चा आहे... म्हणून आता तुम्ही दादागिरीला घाबरत नाही असे म्हणतात... हे खरे आहे का?” असा प्रश्न उज्ज्वल निकम यांनी जयंत पाटील यांना विचारला.
त्यावर जयंत पाटील म्हणाले, “खरं पाहिले तर प्रदेशाध्यक्षपद हे दादा किंवा ताई मुळे नव्हे तर शरद पवार साहेबांमुळे मिळाले आहे..’’
याच कार्यक्रमात ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी राज्यातील चार प्रमुख पक्षातील चार प्रमुख नेत्यांना (अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, परिवहन मंत्री दिवाकर रावते, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील) त्यांच्या प्रश्नांनी कोंडीत पकडण्याचे चांगलेच प्रयत्न केले.
मात्र, चारही नेत्यांनी कधी थेट उत्तर देऊन तर कधी प्रश्नांना बगल देऊन आपली भूमिका मांडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अधून-मधून काही प्रश्नांवर हजरजबाबी उत्तर देऊन कार्यक्रमात रंगात आणली.
संपूर्ण बातमी : उज्ज्वल निकम यांचे प्रश्न, मुख्यमंत्री, मंत्री आणि विरोधी पक्ष नेत्यांची उत्तरं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
शिक्षण
महाराष्ट्र
बॉलीवूड
Advertisement