एक्स्प्लोर

Hyderabad Liberation Day : हैदराबाद मुक्ती संग्राम! मुख्यमंत्र्यांचा निषेध म्हणून शिवसेनेकडून पुन्हा एकदा अभिवादन

Hyderabad Liberation Day :  हैदराबाद मुक्ती संग्राम दिनी शिवसेनेकडून पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी ध्वजारोहण केलेल्या ठिकाणी अभिवादन करण्यात आले.

Hyderabad Liberation Day :  हैदराबाद मुक्ती संग्राम (Marathwada Mukti Sangram Din) दिनी सकाळच्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते औरंगाबादमध्ये आज हैदराबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. मात्र 9 वाजता होणारं हे ध्वजारोहण 7 वाजताच उरकण्यात आले आहे. त्यामुळे याचा निषेध म्हणून शिवसेनेकडून पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी ध्वजारोहण केलेल्या ठिकाणी अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) (Ambadas Danve) आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची उपस्थिती पाहायला मिळाली.

17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरा केला जातो. मात्र यावर्षी याच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ध्वजारणाच्या वेळेवरून शिवसेना-शिंदे गटातील राजकीय वाद पाहायला मिळाले. दरवर्षी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानात सकाळी नऊ वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. मात्र यावर्षी सकाळी सात वाजताच ध्वजारोहण करण्यात आले. त्यामुळे यावर शिवसेनेने आक्षेप घेतला आहे.

शिवसेनेचा आरोप...

यावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे म्हणाले की, दिल्लीतून पातशहा हैदराबादच्या कार्यक्रमाला येणार आहे. त्याच कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा उपस्थित राहायचं होतं. यासाठी औरंगाबादच्या ध्वजहरणाचा वेळ बदलण्यात आला. मुख्यमंत्र्यांची ही भूमिका म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान आहे. याचाच निषेध करण्यासाठी आम्ही नऊ वाजता पुन्हा एकदा अभिवादन केल्याचं दानवे म्हणाले.   मुख्यमंत्र्यांसाठी ज्या घोषणा केल्या त्या जुन्या आहेत, त्यातील अनेक कामं सुरू आहेत.  नवीन कोणतीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केले नसून हा मराठवाड्यावर अन्याय आहे. पश्चिम महाराष्ट्रापेक्षा मराठवाडा मागे आहे. त्याला पुढे आणण्यासाठी हा क्षण होता मात्र मुख्यमंत्र्यांनी काही घोषणा केली.  नऊ वाजता आम्ही पुन्हा एकदा अभिवादन करणार आहोत, असं दानवेंनी सांगितलं. दानवे म्हणाले की, भूखंडाच्या सर्व फाईल थांबवल्या आहेत, एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. उद्योगासाठी हे घातक असून यापूर्वी असं कधीही झालेलं नाही. उद्योजक नाराज असून दिल्लीपर्यंत याच्या तक्रारी गेल्या आहेत, असंही दानवे म्हणाले. 

मराठवाडा मुक्तिसंग्रामच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी फक्त 15 मिनिटं वेळ देणं हा मराठवाडा मुक्त करणाऱ्यांचा अवमान असल्याची टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Operation Polo राबवलं आणि सरदार पटेलांनी माजलेल्या रझाकारांना गुडघ्यावर आणलं, असा आहे हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा इतिहास

Marathwada Liberation Day : मराठवाडा मुक्तिसंग्रामात 'तांदुळजा गढी'चे महत्त्व, याच गढीवर उद्या होणार ध्वजारोहण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Suresh Dhas : खोक्या भाईच्या घरावर वनखात्याने बुलडोझर चालवला, सुरेश धसांना राहवलं नाही, म्हणाले, 'कुणाचं घर पाडणं चांगली गोष्ट नव्हे'
खोक्या भाईच्या घरावर वनखात्याने बुलडोझर चालवला, सुरेश धसांना राहवलं नाही, म्हणाले, 'कुणाचं घर पाडणं चांगली गोष्ट नव्हे'
तर माझं रक्त खवळतं, भर रस्त्यात ना*डा करून ठोकेन, पदावर असल्याने सहनशील; सीएम रेवंत रेड्डींचा कोणाला धमकीवजा इशारा?
तर माझं रक्त खवळतं, भर रस्त्यात ना*डा करून ठोकेन, पदावर असल्याने सहनशील; सीएम रेवंत रेड्डींचा कोणाला धमकीवजा इशारा?
लाज वाटली पाहिजे, देशाला कृषिप्रधान म्हणता? शेतकऱ्याच्या बहिणीने सांत्वनासाठी आलेल्या मंत्र्यांनाच सुनावलं
लाज वाटली पाहिजे, देशाला कृषिप्रधान म्हणता? शेतकऱ्याच्या बहिणीने सांत्वनासाठी आलेल्या मंत्र्यांनाच सुनावलं
Nitin Gadkari : नमाज पठनाबरोबरच विज्ञान-तंत्रज्ञानाचे ज्ञान घेणे गरजेचं; मुस्लिम समाजामध्ये सर्वाधिक...; मंत्री नितीन गडकरी स्पष्टच बोलले
नमाज पठनाबरोबरच विज्ञान-तंत्रज्ञानाचे ज्ञान घेणे गरजेचं; मुस्लिम समाजामध्ये सर्वाधिक...; मंत्री नितीन गडकरी स्पष्टच बोलले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vishal Patil On Chandrakant Patil : चंद्रकात पाटलांची खुली ऑफर खासदार विशाल पाटील स्वीकारणार?ABP Majha Marathi News Headlines 03.00 PM TOP Headlines 03.00 PM 16 March 2025Anandache Paan | बाईच्या मनातलं लिहिणारा पुरूष, लेखक किरण येले यांच्याशी खास गप्पाAnmol Ratna ABP Majha | डिफेन्स करिअर अकादमीचे डॉ. केदार रहाणे महाराष्ट्राचे अनमोल रत्न

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suresh Dhas : खोक्या भाईच्या घरावर वनखात्याने बुलडोझर चालवला, सुरेश धसांना राहवलं नाही, म्हणाले, 'कुणाचं घर पाडणं चांगली गोष्ट नव्हे'
खोक्या भाईच्या घरावर वनखात्याने बुलडोझर चालवला, सुरेश धसांना राहवलं नाही, म्हणाले, 'कुणाचं घर पाडणं चांगली गोष्ट नव्हे'
तर माझं रक्त खवळतं, भर रस्त्यात ना*डा करून ठोकेन, पदावर असल्याने सहनशील; सीएम रेवंत रेड्डींचा कोणाला धमकीवजा इशारा?
तर माझं रक्त खवळतं, भर रस्त्यात ना*डा करून ठोकेन, पदावर असल्याने सहनशील; सीएम रेवंत रेड्डींचा कोणाला धमकीवजा इशारा?
लाज वाटली पाहिजे, देशाला कृषिप्रधान म्हणता? शेतकऱ्याच्या बहिणीने सांत्वनासाठी आलेल्या मंत्र्यांनाच सुनावलं
लाज वाटली पाहिजे, देशाला कृषिप्रधान म्हणता? शेतकऱ्याच्या बहिणीने सांत्वनासाठी आलेल्या मंत्र्यांनाच सुनावलं
Nitin Gadkari : नमाज पठनाबरोबरच विज्ञान-तंत्रज्ञानाचे ज्ञान घेणे गरजेचं; मुस्लिम समाजामध्ये सर्वाधिक...; मंत्री नितीन गडकरी स्पष्टच बोलले
नमाज पठनाबरोबरच विज्ञान-तंत्रज्ञानाचे ज्ञान घेणे गरजेचं; मुस्लिम समाजामध्ये सर्वाधिक...; मंत्री नितीन गडकरी स्पष्टच बोलले
धक्कादायक! दर्ग्याजवळ बोलावून 75 वर्षीय व्यक्तीचा खून; दोन अल्पवयीन प्रेमी युगुल पोलिसांच्या ताब्यात
धक्कादायक! दर्ग्याजवळ बोलावून 75 वर्षीय व्यक्तीचा खून; दोन अल्पवयीन प्रेमी युगुल पोलिसांच्या ताब्यात
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरण साता समुद्रापार, इंग्लंडमध्ये होळीत वाल्मिक कराडसह आरोपींचा फोटो जाळला, महिलेसह चिमुकल्यांकडून निषेध
संतोष देशमुख प्रकरण साता समुद्रापार, इंग्लंडमध्ये होळीत वाल्मिक कराडसह आरोपींचा फोटो जाळला, महिलेसह चिमुकल्यांकडून निषेध
Tornadoes Hit America : तब्बल 264 किमीच्या वेगानं अमेरिकेतील 8 राज्यांना चक्रीवादळाचा तडाखा; 10 कोटी लोक बाधित, 2 लाख घरांमध्ये बत्ती गुल
Video : तब्बल 264 किमीच्या वेगानं अमेरिकेतील 8 राज्यांना चक्रीवादळाचा तडाखा; 10 कोटी लोक बाधित, 2 लाख घरांमध्ये बत्ती गुल
Dattatray Bharne & Nitesh Rane: मंत्रीपद रुबाब करायला नसतं, काळ तुम्हाला उत्तर देईल! मुस्लिमांवर आगपाखड करणाऱ्या नितेश राणेंना अजितदादांच्या मंत्र्याने सुनावलं
मंत्रीपद रुबाब करायला नसतं, काळ तुम्हाला उत्तर देईल! मुस्लिमांवर आगपाखड करणाऱ्या नितेश राणेंना अजितदादांच्या मंत्र्याने सुनावलं
Embed widget