एक्स्प्लोर

पतीने घटस्फोट मागितला, पत्नीने अपत्य मागितलं; महिलेची मागणी कोर्टाकडून मंजूर

न्यायालयीन प्रक्रियेत अनेकदा अर्जदाराचा खूप कालावधी जातो. या प्रकारणातही तसा विलंब होऊ शकला असता. त्यामुळे अशाप्रकारे पत्नीने न्यायालयात फिर्याद दाखल केल्याचं वकिलांनी सांगितलं.

नांदेड : घटस्फोटाचं प्रकरण न्यायालयात सुरु असताना पत्नीने पतीपासून अपत्य व्हावं यासाठी कौटुंबिक न्यायलयात अर्ज दाखल केला असून न्यायालयानेही तो मान्य केला आहे. हे प्रकरण नांदेडमधील आहे. 2010 मध्ये विवाह झालेल्या दाम्पत्यामध्ये कौटुंबिक वाद सुरु होता. पत्नीने सासरी जाण्यासाठी नांदेडच्या कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला होता. तर मुंबईस्थित डॉक्टर पतीने पनवेलमधील कौटुंबिक न्यायालयात 2017 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता. या दाम्पत्याला सहा वर्षांचा मुलगा असून तो सध्या आईसोबतच राहतो. परंतु घटस्फोटाच्या न्यायालयीन लढाईत खूप वेळ जाईल. परिणामी पुन्हा आई होण्याचं वयही निघून जाईल. त्यामुळे आपल्या मुलाला बहिण किंवा भाऊ असावा म्हणून पतीकडून अपत्य व्हावं, यासाठी पत्नीने नांदेडच्या कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. कायद्यानुसार दाम्पत्याला दोन अपत्यांची मुभा आहे. शिवाय अपत्य असणं हा पत्नीचा मूलभूत अधिकार आहे. दुसऱ्या होणाऱ्या अपत्यासाठी पतीकडून कुठलीही पोटगी मागणार नाही, अशी बाजू पत्नीतर्फे न्यायालयात मांडण्यात आली. यासाठी फिर्यादी पक्षातर्फे सर्वोच्च न्यायालयाचं निकाल पत्र देण्यात आलं. हा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आयव्हीएफ किंवा इतर तंत्रज्ञानानुसार अपत्यास जन्म देण्यासाठीचा आदेश दिल्याची माहिती महिलेचे वकील अॅडव्होकेट शिवराज पाटील यांनी दिली. न्यायालयीन प्रक्रियेत अनेकदा अर्जदाराचा खूप कालावधी जातो. या प्रकारणातही तसा विलंब होऊ शकला असता. त्यामुळे अशाप्रकारे पत्नीने न्यायालयात फिर्याद दाखल केल्याचं वकिलांनी सांगितलं. अपत्य प्राप्तीसाठी न्यायालयाने विवाह समुपदेशकाकडे जाण्याचे आदेश दिले आहेत. पुढील प्रक्रियेसाठी तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती केली आहे. घटस्फोटाचं प्रकरण सुरु असताना अपत्य प्राप्तीसाठीचा हा निकाल दुर्मिळ मानला जात आहे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?Zero Hour Maha Exit Poll : ठाकरे की शिंदे, जनतेचा कौल कुणाला? कोण बाजी मारणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget