एक्स्प्लोर

लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर...

सध्या लाडकी बहीण योजनेची सर्वाधिक चर्चा होत आहे. या योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांचे अनेक प्रश्न आहेत. अर्ज दाखल करताना काही चूक झाल्यास योजनेचा लाभ मिळेल का? असा प्रश्न महिलांना पडला आहे.

मुंबई :  सध्या राज्यात महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला मोठ्या संख्येने अर्ज दाखल करत आहेत. पण अनेक महिला शिक्षीत नसल्यामुळे अर्ज दाखल करताना त्यांच्याकडून अनेक चुका होत आहेत. या चुकांमुळे भविष्यात आम्हाला महाराष्ट्र लाडकी बहीण योजनेचा फायदा मिळेल की नाही, अशी शंका महिलांकडून व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर एकदा चूक झालेल्या अर्जात पुन्हा दुरुस्ती करता येते का? असे विचारले जात आहे. 

ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने करता येईल अर्ज

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमांतून अर्ज दाखल करण्याची मुभा आहे. महिला राज्य सरकारच्या नारी शक्ती अॅपच्या माध्यमातून या योजनेसाठी अर्ज दाखल करू शकतात. तसेच ऑनलाईन पोर्टलवरूनही हा अर्ज दाखल करता येईल. ऑनलाईन पद्धतीने दाखल केलेल्या अर्जाचे नंतर व्हेरिफिकेशन केले जाते. त्यामुळे अर्जात चुका झाल्यास त्यात नंतर बदल करता येतो का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

पेंडिंग टू सबमीटचा अर्थ काय?

दरम्यान, अर्ज भरल्यानंतरही तुम्हाला त्यात दुरुस्ती करता येते. त्यासाठी तुम्हाला नारी शक्ती अॅप आणि लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर पर्याय दिसेल. तुम्ही एकदा अर्ज दाखल केल्यानंतर तो In Pending To Submitted  असे दिसेल. पेंडिंग हा शब्द वाचून घाबरून जाण्याची गरज नाही. या इंग्रजी ओळीचा सरळ अर्थ हा तुमचा अर्ज सबमीट झाला असून तो प्रशासकीय पातळीवर पडताळला जात आहे, असा होतो. म्हणजेच तुमचा अर्ज शासनदरबारी सबमीट झाला आहे आणि त्याची सध्या पडताळणी केली जात आहे. तुमचा अर्ज मंजूर आहे की तो नामंजूर करण्यात आलाय हे नंतर समजेल.

असा करा फॉर्म दुरुस्त

In Pending To Submitted याच ऑप्शनखाली तुम्हाला तुमचा अर्ज दुरुस्त करण्याची संधी आहे. निळ्या पट्टीमध्ये In Pending To Submitted असं लिहिलेले आहे. त्याच्या खालच्याच केशरी रंगाच्या पट्टीत Edit Fofm असा ऑप्शन दाखवलेला असतो. याच ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला तुमच्या अर्जात बदल करता येईल. तुम्हाला हवा तो बदल करून तुम्ही तुमचा अर्ज पुन्हा सबमीट करू शकता. म्हणजेच तुम्हाला तुमच्या अर्जात दुरुस्ती करता येते. 

दरम्यान, या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रतिमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. या योजनेसाठी आतापर्यंत कोट्यवधी महिलांनी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. या सर्व अर्जांची सध्या छाननी चालू आहे. लवकरच महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत.

हेही वाचा :

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ; आता 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करणं शक्य!

Mukhyamantri mazi Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! माझी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारचा नवा जीआर, केला 'हा' मोठा बदल!

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
Embed widget