Corona Update | कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रशासन किती तयार? भारत सरकारचा सर्व्हे
कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रशासन किती सज्ज आहे, याचं सर्व्हेक्षण भारत सरकारने केलं आहे. PPE किट, आयसोलेशन बेट, आयसीयू, व्हेन्टिलेटर्स या महत्वाच्या सुविधा उपलब्ध आहेत का याची माहिती घेण्यासाठी हा सर्वे करण्यात आला आहे.
मुंबई : कोरोनाशी लढाईसाठी देश सज्ज आहे. मात्र कोणतंही युद्ध जिंकायचं असल्यास पुरेश शस्त्र आणि सैन्य गरजेचं असतं. कोरोनाविरुद्धचं युद्ध लढायचं असेल तर आपली वैद्यकीय यंत्रणाही तितकीच सक्षम असायला हवी. हे तपासण्यासाठीच भारत सरकारने देशातील आयएएस अधिकाऱ्यांचं सर्वेक्षण केलं आणि देशातील वैद्यकीय यंत्रणेच्या सद्यस्थिताचा आढावा घेतला.
कोरोनाच्या लढाईसाठी देश किती तयार आहेत, यासाठी केलेल्या सर्वेक्षणात आश्चर्यचकीत करणारी माहिती समोर आली आहे. या सर्व्हेत जिल्हा, राज्य आणि देशपातळीवरील आयएएस अधिकाऱ्यांनी आपली माहिती दिली आहे. 266 आयएएस अधिकाऱ्यांनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला.
या सर्व्हेक्षणातून काय समोर आलं?महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार केला तर काय आव्हानं आहेत यावर नजर टाकूया. सध्या आरोग्य सेवा पुरवणाऱ्या सर्वांसाठी आणि रुग्णांसाठी PPE अर्थात पर्सनल प्रोटोक्टिव्ह इक्विपमेंट, मास्क, सॅनिटायझर आणि व्हेन्टिलेटर्स गरजेचे आहेत. याशिवाय एवढ्या गंभीर आणि गुंतागुतीच्या स्थितीत शांत डोक्यांने या संकटाशी सामना करण्यासाठी प्रशिक्षित आणि अनुभवी डॉक्टर्स आणि मेडिकल स्टाफची आवश्यकता आहे. मात्र याची कमतरता असल्याचं सर्व्हेतून समोर आलं आहे.
आयएएस अधिकाऱ्यांना विचारण्यात आलं की PPE किट, मास्क आणि ग्लोव्हज् पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत का? तर 29 टक्के अधिकाऱ्यांनी हो असं उत्तर दिलं, तर 47 टक्के अधिकाऱ्यांनी नाही असं उत्तर दिलं.
आयसोलेशन बेड पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत का? असं विचारण्यात आलं त्यावेळी, 28 टक्के अधिकाऱ्यांनी मान्य केले की पुरेशा प्रमाणात आयसोलेशन बेड उपबल्ध नाहीत. आयसीयू बेडची देखील मोठी गरज सध्या आहे. मात्र केवळ 21 टक्के अधिकाऱ्यांनी मान्य केलं की पुरेशे आयसीयू बेड उपलब्ध आहेत, तर 59 टक्के अधिकाऱ्यांनी आयसीयू बेड पुरेश उपलब्ध नसल्यांचं म्हटलं आहे.
व्हेन्टिलेटर मशीन्सबाबत विचारण्यात आलं त्यावेळी 12 टक्के जिल्हाधिकाऱ्यांनी पुरेश व्हेन्टिलेटर्स असल्याचं मान्य केलं, तर 72 टक्के जिल्हाधिकाऱ्यांना पुरेशे व्हेन्टिलेटर्स नसल्याचं मान्य केलं आहे.
Lockdown | पंतप्रधान मोदींना प्रत्येक गोष्टींचा इव्हेंट का करावा वाटतो : जितेंद्र आव्हाड
संबंधित बातम्या