Ajay Baraskar on Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात उद्या बाॅम्ब टाकणार, ईडीकडे सुद्धा जाणार : अजय बारसकर
बंद दाराआड बैठक झाल्यानंतर लोणावळामध्ये सरसकट शब्द का सोडला? अंतरवली मागणीमध्ये ज्या 45 बांधवांनी आत्महत्या केली त्यांच्यासाठी सरकारी नोकरी का सुटली? अशी विचारणा त्यांनी केली.
मुंबई : मनोज जरांगे पाटील कोणत्या व्यक्तीला आमदार बनायचं स्वप्न दिलं आहे त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. जरांगे पाटलांच्या नातेवाईकांकडे कसे काय 45 डंपर आले, याची चौकशी करण्यासाठी मी ईडीकडे जाणार असल्याचे अजय बारसकर यांनी म्हटले आहे. मी उद्या (25 फेब्रुवारी) त्यांच्याविरोधात सकाळी अकरा वाजता बाॅम्ब टाकणार असल्याचे ते म्हणाले.
बंद दाराआड तुमची काय डील झाली?
ते म्हणाले की, मी महाराज सोबत वकील पण आहे. माझ्याकडे त्यांचा पुरावा असून माझ्याकडे मनोज जरांगेंची रेकॉर्डिंग आहे, आज मी मनोज दादा बोलत आहे. मनोज जरांगे पाटील लोणावळामध्ये बंद दाराआड का मीटिंग घेतली?असा मी प्रश्न विचारला. बंद दाराआड तुमची काय डील झाली? 14 तारखेला जी सभा झाली त्यामध्ये जरांगे पाटील यांनी सहा मागण्या केल्या होत्या. त्या सभेमध्ये तुम्ही समाजाची मागणी मान्य केली. लोणावळामध्ये सरसकट शब्द सोडून दिले. बंद दाराआड बैठक झाल्यानंतर लोणावळामध्ये सरसकट शब्द का सोडला? अंतरवली मागणीमध्ये ज्या 45 बांधवांनी आत्महत्या केली त्यांच्यासाठी सरकारी नोकरी का सुटली? अशी विचारणा त्यांनी केली.
ट्रॅप कोणावर होतो जो काळा धंदा करतो, ते काळा धंदा करतात का?
2017 मध्ये मनोज जरांगे पाटील याची काय मागणी होती ते अजय बारसकर यांनी दाखवत ओबीसीपेक्षा वेगळ्या आरक्षणची मागणी जरांगे पाटील यांची होती. मात्र, आता बदलला आणि कुणबी दाखला पाहिजे. जरांगे यांनी आरोप केला त्या महिलेला आणा, असेही ते म्हणाले. मनोज जरांगेंवर पुण्यामध्ये फसवणुकीची केस आहे. जरांगे बोलतात मी ट्रॅप आहे, ट्रॅप कोणावर होतो जो काळा धंदा करतो. ते काळा धंदा करतात का? ज्या पिटीशनमुळे गायकवाड कमिटीचा आरक्षण आले ते माझ्यामुळे आले. उद्या 11 वाजता इथे बॉम्ब स्पॉट होणार आहे. जरांगे कसा आहे त्याबद्दल बॉम्ब फोडणार आहे, असे ते म्हणाले.
मराठा बांधव आक्रमक; सुरक्षेत वाढ
दुसरीकडे, राज्य सरकारकडून मराठ्यांना स्वतंत्र 10 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णय आल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच अजय बारसकर यांनी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप केले होते. यानंतर आता मराठा समाजाच्या रोषाला अजय बारसकर यांना जावं लागलं आहे. अजय बारसकर यांच्यावर काल (23 फेब्रुवारी) मुबंईत हल्ल्याचा प्रयत्न झाला. चर्चगेट परिसरामध्ये बारसकर प्रवास करत असताना काही लोकांनी त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. मरीन ड्राइव्ह पोलिसांनी हल्लेखोरांना अडवत ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर बारसकर यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या