एक्स्प्लोर
हिंगणघाटच्या लेकीचा संघर्ष थांबला, पीडीत तरूणीवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार
वडिलांनी पीडितेच्या पार्थिवाला अग्नी दिला. अंत्यसंस्कारासाठी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ आणि इतर लोक उपस्थित होते.

वर्धा : वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांड पीडितेची झुंज अपयशी ठरली. सोमवारी (10 फेब्रुवारी) अत्यंत शोकाकुल वातावरणात दारोडा गावाने आपल्या लेकीला निरोप दिला. वडिलांनी पीडितेच्या पार्थिवाला अग्नी दिला. अंत्यसंस्कारासाठी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ आणि इतर लोक उपस्थित होते. अंत्यसंस्काराआधी नातेवाईकांनी लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका घेतली होती. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. हिंगणघाट घटनाक्रम : 02 फेब्रुवारी दुपारी 3 वाजता – आरोपी विकेश नगराळे यानं गाडीतील 2 ते 3 लीटर्स पेट्रोल काढून जाळण्याची तयारी सुरू केल्याची माहिती. 03 फेब्रुवारी सकाळी 7.15 वाजता– पिडीत मुलगी कॉलेजमधे जात असताना आरोपी विकेश नगराळे यानं हिंगणघाटमधे नंदोरी चौकात पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. ज्यामधे मुलगी 40 टक्के जळाली.
- पहाटे घरातून निघताना अतिरिक्त कपडे घेऊन तो गेला होता.
- तरुणीला जाळण्याचा उद्देशानं गाडीतून पेट्रोल 2 - 3 दिवसआधीच काढून ठेवल्याची माहिती आहे. बॉटलमधून पिडीतेच्या अंगावर पेट्रोल टाकताना ते इकडे तिकडे पडून वाया जाऊ नये, संपूर्ण पेट्रोल अंगावर पडावे म्हणून प्लास्टिक एक बॉटलला आधीच वरून कटर ने कापून त्याचा मग सारखा तयार केला होता.
- पीडितेवर पेट्रोल टाकून तिला जाळल्यानंतर आरोपी रिमडोह शिवार, राधानगरी परिसरात गेला. तिथे आपले कपडे बदलले. त्याच्या कपड्यांवर ही पेट्रोलचे शिंतोडे उडले असावे, आणि हे कपडे पुढे पुरावा म्हणून महत्वाचे . कपडे जप्त केले आहे पोलिसांनी जप्त केले आहे. इतर ही काही वस्तू जप्त केले आहे
- त्यानंतर दुसरे कपडे घालून आरोपी आजंता या गावात जवळच्या नातेवाईकांकडे गेला.
- त्यांच्याकडे काही वेळ बसला. तिथून एका दुसऱ्या फोनने आपल्या एका जवळच्या मित्राला फोन करून त्याने काय केले आहे हे सांगितले आणि पुढे टाकळघाट मार्गे नागपूरला जाण्यासाठी 9:30 च्या सुमारास आजंती मधून निघाला.
- टाकळघाट येथे मात्र तो विक्तूबाबा मंदिराजवळ अकरा ते साडे अकरा दरम्यान तो नागपूर ग्रामीण पोलिसांच्या हाती लागला आणि त्याला वर्धा पोलिसांच्या स्वाधीन केले गेले.
आणखी वाचा























