एक्स्प्लोर

पाकिस्तानातून आलेलं हिंदू कुटुंब नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे आनंदी, मुलीच नाव ठेवलं 'नागरिकता'

पाकिस्तानमधून दिल्लीत आलेला एक हिंदू परिवार नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यामुळे या ऐतिहासिक घटनेचे सेलिब्रेशन करत आहे.

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेनंतर राज्यसभेतही मंजूर झालं आहे. परंतु विरोधी पक्ष आणि देशभरातील हजारो लोक या विधेयकाला विरोध करत आहेत. हे विधेयक संविधानाच्या मुलभूत सिद्धांतांच्या विरोधात असल्याचे विरोधी पक्षाचे म्हणणे आहे. तर दुसऱ्या बाजूला मोदी सरकारचे म्हणणे आहे की, या विधेयकामुळे संविधानामधील कोणत्याही कलमाचे उल्लंघन होत नाही. एका बाजूला या विधेयकावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरु असताना, दुसऱ्या बाजूला भारतात आलेल्या हिंदू, पारशी, ख्रिश्चन, शीख शरणार्थींमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पाकिस्तानमधून दिल्लीत आलेला एक हिंदू परिवार या ऐतिहासिक घटनेचे सेलिब्रेशन करत आहे. हा परिवार 2011 साली पाकिस्तानातून भारतात आला आहे. परंतु अद्याप या कुटुंबाला भारताचं नागरिकत्व मिळालेलं नाही. या कुटुंबातील आरती नावाच्या एका महिलेने सांगितले की, तिचे भविष्य या विधेयकावर अवलंबून आहे. आरतीला दोन लहान मुलं आहेत. तिचं एक बाळ दोन वर्षांचं आहे, तर दुसरं बाळ हे केवळ सहा दिवसांचं आहे. दुसऱ्या बाळाचं बारसं झालेलं नव्हतं. परंतु काल नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर आरतीने तिच्या बाळाचं बारसं केलं. आरतीने तिच्या बाळाचं नाव 'नागरिकता' असं ठेवलं आहे. 'नागरिकता'च्या आजीने सांगितले की, हे विधेयक मंजूर होईल आणि आम्हाला देशाचे नागरिकत्व मिळेल, या आशेवर आमच्या संपूर्ण कुटुंबाने 'नागरिकता' हे नाव ठेवलं आहे. जेव्हा बाळ जन्माला आले तेव्हापासून देशभरात नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर चर्चा सुरु आहेत. त्यामुळेच आम्ही तिचे नाव नागरिकता ठेवले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या;  पुणे जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी; पूजा खेडकरमुळे चर्चेत आलेल्या दिवसेंना पदोन्नती
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुणे जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी; पूजा खेडकरमुळे चर्चेत आलेल्या दिवसेंना पदोन्नती
Ladki Bahin Yojana : मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
मुंंडेंच्या परळीत पोलीसप्रमुख, तहसीलदार अन् BDO सुद्धा वंजारीच; अंजली दमानियांनी शेअर केली यादीच
मुंंडेंच्या परळीत पोलीसप्रमुख, तहसीलदार अन् BDO सुद्धा वंजारीच; अंजली दमानियांनी शेअर केली यादीच
Stock Market: 10 दिवसामंध्ये शेअर 80 टक्क्यांनी वाढला, हॉटेल कंपनीचा शेअर बनला रॉकेट, गुंतवणूकदार मालामाल
हॉटेल कंपनीचा शेअर 10 दिवसात 80 टक्क्यांनी वाढला, गुंतवणूकदार मालामाल, शेअर बनला रॉकेट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 02 January 2025Jitendra Awhad PC| राजाला वाचवण्यासाठी बुद्धिबळात प्यादाला मारले जाते, वाल्मिक कराडवरून टीकाPankaja Munde on Mumbai Pollution | मुंबईच्या प्रदुषणात वाढ, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या..Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana | 'त्या' लाडक्या बहि‍णींचे पैसे बंद होणार, कोणकोण अपात्र ठरणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या;  पुणे जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी; पूजा खेडकरमुळे चर्चेत आलेल्या दिवसेंना पदोन्नती
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुणे जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी; पूजा खेडकरमुळे चर्चेत आलेल्या दिवसेंना पदोन्नती
Ladki Bahin Yojana : मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
मुंंडेंच्या परळीत पोलीसप्रमुख, तहसीलदार अन् BDO सुद्धा वंजारीच; अंजली दमानियांनी शेअर केली यादीच
मुंंडेंच्या परळीत पोलीसप्रमुख, तहसीलदार अन् BDO सुद्धा वंजारीच; अंजली दमानियांनी शेअर केली यादीच
Stock Market: 10 दिवसामंध्ये शेअर 80 टक्क्यांनी वाढला, हॉटेल कंपनीचा शेअर बनला रॉकेट, गुंतवणूकदार मालामाल
हॉटेल कंपनीचा शेअर 10 दिवसात 80 टक्क्यांनी वाढला, गुंतवणूकदार मालामाल, शेअर बनला रॉकेट
Dhule Crime News : मोये मोये.... OYO हॉटेलवर पोलिसांची धाड; 'त्या' अवस्थेत आढळले तरुण-तरुणी, धुळ्यात खळबळ
मोये मोये.... OYO हॉटेलवर पोलिसांची धाड; 'त्या' अवस्थेत आढळले तरुण-तरुणी, धुळ्यात खळबळ
बीडसाठी उज्ज्वल निकमांना फोन, 5 पलंगबाबतही स्पष्टीकरण; मंत्रिमंडळ बैठकीनंतर CM देवेंद्र फडणवीसांची माहिती
बीडसाठी उज्ज्वल निकमांना फोन, 5 पलंगबाबतही स्पष्टीकरण; मंत्रिमंडळ बैठकीनंतर CM देवेंद्र फडणवीसांची माहिती
Dhananjay munde: धनजंय मुंडेंचा घोडा पाहण्यासाठी गर्दी; माळेगावच्या जत्रेत भाव खाऊन गेला धनुभाऊंचा 'बादल'
धनजंय मुंडेंचा घोडा पाहण्यासाठी गर्दी; माळेगावच्या जत्रेत भाव खाऊन गेला धनुभाऊंचा 'बादल'
संतोष देशमुखांच्या लेकीची आर्त हाक, आता पुण्यात निघणार जनआक्रोश मोर्चा; तारीख अन् ठिकाणही ठरलं
संतोष देशमुखांच्या लेकीची आर्त हाक, आता पुण्यात निघणार जनआक्रोश मोर्चा; तारीख अन् ठिकाणही ठरलं
Embed widget