एक्स्प्लोर

'हेलिकॉप्टर ढगात सापडलं, पायलटही घाबरला, मग मी त्याला सांगितलं...' शरद पवारांनी सांगितला किस्सा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सीडीएस जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांना श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी पवार यांनी त्यांच्यासोबत घडलेला एक किस्सा सांगितला.

मुंबई : कर्नाटक-तामिळनाडू सीमेवर कुन्नूरजवळ हवाईदलाच्या अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या IAF MI 17 हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला. या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांच्यासह 14 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर सर्व स्तरांतून सीडीएस जनरल रावत यांच्यासह मृत्यू पावलेल्या सर्वांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. शिवाय या घटनेनंतर याआधीच्या काही घटनांवर देखील बोललं जात आहे. 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही रावत यांना श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी पवार यांनी त्यांच्यासोबत घडलेला एक किस्सा सांगितला. माझा एक व्यक्तिगत अनुभव आहे. मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी एक दिवस मी पुण्याहून मुंबईला हेलिकॉप्टरने निघालो होतो.
 
'त्यावेळी माझी पत्नी आणि एक राज्यमंत्री माझ्यासोबत होते. तेव्हा लोणावळा संपून खोपोलीकडे जाताना एक व्हॅली आहे. तिथे अनेकदा ढग असतात. आमचं हेलिकॉप्टर तिथून जात असताना ढगात आम्ही सापडलो, खूप वारा होता त्यामुळे ते हेलिकॉप्टर पुढे जायला मर्यादा आल्या. वाऱ्याचा वेगही जास्त होता.  ढगात सापडल्यामुळे आजुबाजूचं काही दिसत नव्हतं.'

Bipin Rawat : शक्तिमान अधिकाऱ्याला देश मुकला...पण देशाच्या दृष्टीने ही चिंतेची बाब; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

'आम्ही तिथे काळजी घेतली नसती तर ते हेलिकॉप्टर व्हॅलीमध्ये कुठेतरी आदळलं असतं. पण मला साधारणपणे संपूर्ण महाराष्ट्राची माहिती असल्यामुळे मी सांगितले, महाराष्ट्रात कळसूबाई हे सर्वांत उंच शिखर आहे. ते 5 हजार फुटांच्यावर नाही. तेव्हा मी तातडीने पायलटला सांगितलं की आपण 7 हजार फूट उंचीवर गेलो तर काही अडथळा येणार नाही. ते हेलिकॉप्टर धडकण्याची शक्यता नाही. त्यामुळे ढगांचा अडथळा पार करुन सुखरुपपणे आम्ही उतरू शकलो,' असं पवार यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या
Bipin Rawat Death : सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या निधनानं शोक; कोण असतील देशाचे पुढचे सीडीएस?

CDS Bipin Rawat Death : सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार, आज दिल्लीत दाखल होणार पार्थिव

महत्त्वाच्या बातम्या

सोमेश्वर कारखान्यासाठी राष्ट्रवादी अन् शिवसेनेची युती; पुरुषोत्तम जगतापांच्या बंडामुळे भाजपही मैदानात, तिरंगी लढत
सोमेश्वर कारखान्यासाठी राष्ट्रवादी अन् शिवसेनेची युती; पुरुषोत्तम जगतापांच्या बंडामुळे भाजपही मैदानात, तिरंगी लढत
Pradeep Purnekar Death Case मित्रानेच काटा काढला, गोळीबारानंतर रुग्णालयातही घेऊन गेला; प्रदीप पूर्णेकरांच्या हत्याप्रकरणात नवा अँगल
मित्रानेच काटा काढला, गोळीबारानंतर रुग्णालयातही घेऊन गेला; प्रदीप पूर्णेकरांच्या हत्याप्रकरणात नवा अँगल
सांगली बँकेच्या निवडणुकांसाठी गोपीचंद पडळकरांचा अर्ज, जयंत पाटलांविरुद्ध घोषणाबाजी; कार्यालयात तणाव
सांगली बँकेच्या निवडणुकांसाठी गोपीचंद पडळकरांचा अर्ज, जयंत पाटलांविरुद्ध घोषणाबाजी; कार्यालयात तणाव
Tukaram Mundhe Slams Celebrites Paan Gutka Advertise: 'आधी तुमच्या मुलांना गुटखा खायला द्या, त्यांनाही सवय लावा...'; तुकाराम मुंढे पान-मसाल्याची जाहीरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर संतापले
'आधी तुमच्या मुलांना गुटखा खायला द्या, त्यांनाही सवय लावा...'; तुकाराम मुंढे पान-मसाल्याची जाहीरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर संतापले

व्हिडीओ

Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha
Raj Thackeray Rahul Gandhi : राज-राहुल संपर्क? चर्चेत राऊतांचा तर्क Special Report
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai News: खबरीनं पोलिसांना टीप दिली, मुंबईतील क्लिनिक, 4 वर्षांपासून फ्रिजमध्ये ठेवलेला मृतदेह अन्..., परिवारानं सांगितलं कारण, घटनेबाबत चक्रावणारी माहिती समोर
खबरीनं पोलिसांना टीप दिली, मुंबईतील क्लिनिक, 4 वर्षांपासून फ्रिजमध्ये ठेवलेला मृतदेह अन्..., परिवारानं सांगितलं कारण, घटनेबाबत चक्रावणारी माहिती समोर
सोमेश्वर कारखान्यासाठी राष्ट्रवादी अन् शिवसेनेची युती; पुरुषोत्तम जगतापांच्या बंडामुळे भाजपही मैदानात, तिरंगी लढत
सोमेश्वर कारखान्यासाठी राष्ट्रवादी अन् शिवसेनेची युती; पुरुषोत्तम जगतापांच्या बंडामुळे भाजपही मैदानात, तिरंगी लढत
तब्बल 3 हजार कोटींच्या अंमली पदार्थांसह 5 पाकिस्तानींच्या मुसक्या आवळल्या; इराणी बोटीतून मुबंईत येताना लक्षद्वीपजवळ तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने पकडलं
तब्बल 3 हजार कोटींच्या अंमली पदार्थांसह 5 पाकिस्तानींच्या मुसक्या आवळल्या; इराणी बोटीतून मुबंईत येताना लक्षद्वीपजवळ तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने पकडलं
Rule Change: एलपीजी,मुदत ठेव, एटीएम ते यूपीआय ऑक्टोबरमध्ये 7 नियमांमध्ये मोठे बदल, जाणून घ्या  
एलपीजी,मुदत ठेव, एटीएम ते यूपीआय ऑक्टोबरमध्ये 7 नियमांमध्ये मोठे बदल, जाणून घ्या  
ज्ञानेश कुमार चोर आणि दरोडेखोर, मतचोरी केली, ईव्हीएम मशीन जाळल्या, हॅक केल्या; 'जर तत्काळ ज्ञानेशकुमारांनी राजीनामा नाही दिला, तर..' ममता बॅनर्जींचा रुद्रावतार!
ज्ञानेश कुमार चोर आणि दरोडेखोर, मतचोरी केली, ईव्हीएम मशीन जाळल्या, हॅक केल्या; 'जर तत्काळ ज्ञानेशकुमारांनी राजीनामा नाही दिला, तर..' ममता बॅनर्जींचा रुद्रावतार!
कळसूत्री बाहुल्यांचे मोदी शाहाच सूत्रधार, तेच मतचोरी करून निवडणूक जिंकत आहेत; देशव्यापी मोर्चे ते निवडणूक आयोगावर भव्य मोर्चा, इंडिया आघाडीने निर्णायक रणशिंग फुंकलं!
कळसूत्री बाहुल्यांचे मोदी शाहाच सूत्रधार, तेच मतचोरी करून निवडणूक जिंकत आहेत; देशव्यापी मोर्चे ते निवडणूक आयोगावर भव्य मोर्चा, इंडिया आघाडीने निर्णायक रणशिंग फुंकलं!
सांगली बँकेच्या निवडणुकांसाठी गोपीचंद पडळकरांचा अर्ज, जयंत पाटलांविरुद्ध घोषणाबाजी; कार्यालयात तणाव
सांगली बँकेच्या निवडणुकांसाठी गोपीचंद पडळकरांचा अर्ज, जयंत पाटलांविरुद्ध घोषणाबाजी; कार्यालयात तणाव
Supreme Court on Firecracker Verdict: मोठी बातमी! फटाक्यांवरील देशव्यापी बंदीच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाचे महत्वाचे निरीक्षण; म्हणाले, पूर्णपणे बंदी घालता येणार नाही, पण...
मोठी बातमी! फटाक्यांवरील देशव्यापी बंदीच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाचे महत्वाचे निरीक्षण; म्हणाले, पूर्णपणे बंदी घालता येणार नाही, पण...
Embed widget