Weather Update: अजून किती दिवस राहणार उष्णतेची लाट? तापमानाच्या उच्चांकाने नागरिक हैराण, 4 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचे इशारे
येत्या चार दिवसांत राज्यात ठिकठिकाणी प्रचंड उष्णता राहणार असून तापमान 43-45 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता हवामान तज्ञ व्यक्त करत आहेत.

Maharashtra weather update: संपूर्ण महाराष्ट्रात तापमानाचा उद्रेक होत आहे. विदर्भासह मराठवाड्यात तापमानाचा भडका उडाला आहे. बहुतांश ठिकाणी 44 अंशापर्यंत तापमान पोहोचले आहे. आज सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपुरात झाली असून हवामान विभागाने 44.6 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले आहे. मराठवाड्यात बीड, परभणी, नांदेड 42 अंशाने पुढे गेले आहेत. तर मध्य महाराष्ट्रात 38 ते 40 अंश सेल्सिअस एवढा पारा आहे. कोकणात सामान्य होऊन अधिक तापमानाची नोंद होत असून प्रचंड उकाडा वाढला आहे. उन्हाच्या झळा आणि तापमानाच्या चटक्याने नागरिक हैराण झाले आहेत. (IMD)
आज कोणत्या जिल्ह्यात किती तापमानाची नोंद?
मुंबई शहरात व उपनगरात असते 33 अंशांच्या पुढे तापमान गेले होते. पालघर 35.2 अंश, ठाणे 36.2 अंश, रत्नागिरी 33.4 अंशांवर आहे .पुण्यात 38.7 ,सातारा 39.9, सांगली 38.7, कोल्हापूर 37.7, अंश सोलापुरात 43 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले .मराठवाड्यात छत्रपती संभाजी नगर मध्ये 41.6°c बीड, परभणी 4 2.4,लातूर 40.8 धाराशिव 41.8,विदर्भात अकोल्यात 44.3 वाशिम 42.6 अमरावती 44.4 यवतमाळ 43.6 चंद्रपूर 44.6 नागपूर 44 चंद्रपूर 42.6 गोंदिया 42.2 भंडारा 41.4,जळगावात 41 अंश सेल्सिअस तर नंदुरबारमध्ये 41.8 अंश सेल्सिअसली आज नोंद झाली.
अवकाळी पाऊस,उष्णतेचे अलर्ट कुठे?
आज लातूर धाराशिव सोलापूर सांगली या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचे येलो अलर्ट देण्यात आले आहेत .नांदेड, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला यलो अलर्ट नसला तरी पावसाची शक्यता आहे .
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अकोला, अमरावती, चंद्रपूर या जिल्ह्यांना उष्ण व दमट हवामानाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. नागपूरमध्ये पुढील तीन दिवस उष्णतेची लाट राहणार आहे .वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला या जिल्ह्यांमध्येही उष्णतेची लाट कायम राहणार आहे .येत्या चार दिवसांत मराठवाडा आणि विदर्भात 42 अंशांहून अधिक तापमान राहण्याची शक्यता आहे.
21 April, आयएमडी मॉडेल मार्गदर्शनानुसार, विदर्भ,मराठवाडा प्रदेशातील कमाल तापमान पुढील ४-५ दिवसांत काही ठिकाणी ४२°Transfer व त्याहून अधिक असू शकते.परिस्थिती आणखी कायम राहण्याची शक्यता.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 21, 2025
कृपया आयएमडीच्या अपडेट्स व उष्णतेच्या लाटेच्या सूचनांवर लक्ष ठेवा.काळजी घ्यावी. #Beat_the_heat pic.twitter.com/88sn6ewxzB
अजून किती दिवस उष्णतेची लाट?
हवामान तज्ञांनी नोंदवलेल्या निरिक्षणांनुसार, यंदा एप्रिल ते जूनपर्यंत उष्णतेच्या लाटांचे प्रमाण वाढते आहे. येत्या चार दिवसांत राज्यात ठिकठिकाणी प्रचंड उष्णता राहणार असून तापमान 43-45 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता हवामान तज्ञ व्यक्त करत आहेत. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, येते चार ते पाच दिवस विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. काेकण विभागात येत्या दोन दिवसात तापमान आणखी 2-3 अंशांनी वाढणार आहे. उर्वरित ठिकाणी 72 तास तापमानात मोठे बदल नसले तरी त्यानंतर तापमान पुन्हा वाढणार आहे.
हेही वाचा:
ती आत्महत्या नसून हत्या; किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप, हाती बॅनर घेऊन वृद्धाचं मंत्रालयासमोर आंदोलन























