एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

राज्यात उष्णतेची लाट येणार, अवकाळीचा जोरही कायम राहणार, हवामानचा नेमका अंदाज काय? 

राज्यातील तापमानात (Temperature) सातत्यानं वाढ होत आहे. कुठं उन्हाचा चटका बसत आहे. तर कुठं अवकाळीचा जोर पाहायला मिळत आहे.

Maharashtra Weather News : राज्यातील तापमानात (Temperature) सातत्यानं वाढ होत आहे. कुठं उन्हाचा चटका बसत आहे. तर कुठं अवकाळीचा जोर पाहायला मिळत आहे. दरम्यान, संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, नंदुरबार, धुळे जळगांव, नाशिक, अहमदनगर अशा 24 जिल्ह्यात दुपारचे कमाल तापमान सरासरीपेक्षा 4 ते 6 डिग्री से. ग्रेड ने अधिक वाढणार आहे. म्हणजे 40 ते 44 डिग्री से. ग्रेड दरम्यानचे राहणार असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. पण या स्थितीतही अवकाळीची शक्यता कायम राहणार आहे. 

आजपासून पुढील तीन दिवस म्हणजे शनिवार दिनांक 25 मे पर्यंत उष्णतेच्या  लाटेची स्थिती जाणवू शकते अशी माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
पुढील तीन दिवस गुजरात राज्य आणि मुंबईसह कोकणातील 7 जिल्ह्यात उष्णतेची लाटसदृश स्थितीसहित दमटयुक्त उष्णतेची स्थिती जाणवेल. विशेषतः या उष्णतेचा प्रभाव मुंबई शहर, ठाणे, पालखेड येथे अधिक जाणवेल, अशी माहिती माणिकराव खुळे यांनी दिली.  

अवकाळीची शक्यता कायम

उष्णतेची लाट सदृश्यस्थिती असली तरी संपूर्ण महाराष्ट्रात आजपासून पुढील तीन दिवस म्हणजे 25 मे पर्यंत ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता कायम आहे. गुरुवार, शुक्रवार म्हणजेच दिनांक 23 आणि 24 मे असे दोन दिवस दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि नांदेड या 8 जिल्ह्यात अवकाळीची शक्यता अधिक जाणवेल अशी माहिती माणिकराव खुळे यांनी दिली. 

मराठवाड्यासह विदर्भातील 19 जिल्ह्यात 24 मे  पासून अवकाळीचे ढगाळ वातावरणही निवळेल. तर मुंबईसह कोकण, खान्देश, नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर येथे मात्र 24 मे नंतरही वातावरण टिकून राहील.  दरम्यान, अंदमानवर पोहोचलेल्या मान्सूनची आगेकूच कायम असून बंगालच्या उपसागरात आठवड्यादरम्यान कदाचित चक्रीवादळाच्या बीज-रोवणीही होवु शकते असे वाटते. 

अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका

दरम्यान, सध्या सुरु असलेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका काही भागातील शेती पिकांना बसला आहे. शेतकऱ्यांची हाती आलेली पिकं वाया गेली आहेत. विशेषत: फळबागांसह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान, अशाच स्थितीत आणखी अवकाळी पावसाची शक्यता सांगितली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना चिंता वाटत आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Unseasonal Rain : विदर्भात पुन्हा अवकाळी पावसाचं थैमान! धान्य भिजलं, केळी पिकांचेही प्रचंड नुकसान

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde All MLA | शिवसेनेचे निवडून आलेले सर्व आमदार एकच फ्रेममध्ये!Eknath Shinde MLA Welcome | निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांचं शिंदेंकडून स्पेशल वेलकमDevendra Fadnavis CM? | संघाची फडणवीसांना पसंती असू शकते का? Special ReportMahayuti Ladki bahin Yojana | महायुतीसाठी लाडकी बहीण योजना ठरली गेमचेंजर! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Embed widget