एक्स्प्लोर
Advertisement
हर्षवर्धन पाटील भाजपात येणार होते, तावडेंचा गौप्यस्फोट
पुणे: माजी मंत्री आणि काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील भाजपात येणार होते, पण त्यांना मी रोखलं असा गौप्यस्फोट भाजप नेते आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला. ते इंदापुरात बोलत होते.
इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ, विनोद तावडे यांनी भिगवण येथील सभेला संबोधित केलं.
यावेळी तावडे म्हणाले, "हर्षवर्धन पाटील हे गोपीनाथ मुंडेंचे लाडके होते. परवाचं आमचं सरकार सत्तेत येईपर्यंत सर्वाधिक सत्तेत कोण राहिले तर हर्षवर्धन पाटील. आधी आमच्याबरोबर, मग आम्ही जातोय हे कळल्या-कळल्या त्यांनी काँग्रेसमध्ये उडी मारली. मग विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील हे आमच्याकडे (भाजपत) येणार होते. पण मीच त्यांना घेऊ नका असं मुख्यमंत्र्यांना सांगितलं"
तावडे यांच्या या गौप्यस्फोटाने इंदापुरात एकच खळबळ उडाली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
नाशिक
निवडणूक
Advertisement