Ravi Rana Vs Bcchu Kadu : रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या वादात गुलाबराव पाटील यांची उडी, म्हणाले.....
Ravi Rana Vs Bcchu Kadu : गेल्या काही दिवसांपासून आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली आहे. दोघांकडूनही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यात आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी उडी घेतली आहे.
Ravi Rana Vs Bcchu Kadu : आमदार रवी राणा ( Ravi Rana ) आणि आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या वादात आता पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil ) यांनी उडी घेतली आहे. "आमदार रवी राणा यांनी जे वक्तव्य केलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. एका व्यक्तीवर आरोप म्हणजे सर्वच आमदारांवर आरोप करण्यासारखं आहे. कोणी विकावू नाहीय, तुमच्या एका वादामुळे चाळीस आमदारांना बदनाम करण्याची गरज नाही. त्यामुळे रवी राणा यांनी त्यांचे शब्द मागे घ्यावे, असे खडे बोल गुलाबराव पाटील यांनी रवी राणा यांना सुनावत बच्चू कडू यांची बाजू घेतली आहे.
गेल्या काही दिवसांपासून रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली आहे. दोघांकडूनही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यातच बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन पैसे घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी केला आहे. तर पैसे घेतल्याचे रवी राणा यांनी पुरावे द्यावेत अन्यथा त्यांच्यावर माहनहानीचा दावा दाखल करून असा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय. दोघांमध्ये वाद सुरू असतानाच आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी रवी राणा यांनी आपले शब्द मागे घ्यावेत असे आवाहन केले आहे,
"रवी राणा यांनी त्यांचे शब्द मागे घेतली नाही तर ही गोष्ट चुकीची होईल आणि लोकांमध्ये सभ्रम निर्माण होईल. 40 वर्षाचं करियर लावून लोक तुमच्यासोबत मैदानात उतरले आहेत. त्यामुळे रवी राणा यांना आवर घालावा अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांना करतो. तसेच दोघानाही शांत बसवावं, हीच प्रार्थना आहे, असेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.
शिंदे सरकारने महाविकास आघाडीच्या नेत्यांची काल सुरक्षा काढली आहे. सरकारच्या या निर्णयावर विरोधकांकडून टीका होत आहे. यावरही मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. सुरक्षा काढण्यावरून कुणी राजकारण करत नसतो, एखाद्या नेत्याची सुरक्षा काढल्याने कुणाला काही आनंद होत नसतो, सुरक्षे संदर्भात एक कमिटी काम करते, त्यानुसार तो निर्णय होतो. या समितीच्या आलेल्या आढावानुसारच सुरक्षा करण्यात आली असून कोणत्याही नेत्याची सुरक्षा काढण्यामध्ये सरकारला स्वारस्य नाही, असे मत मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
सामनाच्या अग्रलेखातून काल उपमुख्यमं६ी देवेंद्र फडणीस यांना कटुता संपवावी अशी साद घालण्यात आली आहे, यावरूनही मंत्री गुलाबराव पाटील यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. यापूर्वीच अशी साद घातली असती तर आज ही वेळ आली नसती. ज्यावेळी फाटा फुट झाली त्यावेळी आम्ही समजवण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी ही साद घातली गेली असती तर आज बासुंदी आणि विष म्हणून कटुता संपवा अशी वेळ आली नसती, असा टोला गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या