एक्स्प्लोर

आक्षेपार्ह वक्तव्य भोवणार? बच्चू कडू यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल  

Bachu Kadu  : अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण बच्चू कडू यांच्याविरोधात अमरावतीत अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

अमरावती :  अपक्ष आमदार बच्चू कडू (Bachu Kadu) आणि अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यात 'खोके' घेतल्यावरून आरोप प्रत्यारोप सुरु असताना आता महिला मुक्ती मोर्चा संघटनेने देखील या वादात उडी घेतली आहे. दोन आमदारांच्या वादात महिलांचा विनाकारण अपमान होत असल्याची तक्रार महिला मुक्ती मोर्चाने दिली आहे. यावरून आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. आमदार रवी राणा यांच्याबाबत टीका करताना बच्चू कडू यांनी महिला वर्गाचा अपमान केलाय असा आरोप करत महिला मुक्ती मोर्चा संघटनेकडून बच्चू कडू यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर अमरावतीमधील राजापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. 

 बच्चू कडू आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद चालू आहे. याताच बच्चू कडू यांनी पैसे घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी केल्यामुळे त्यांच्यातरी हा वाद टोकाला गेलाय. राणा यांच्या आरोपाला उत्तर देताना बच्चू कडू यांनी  राणा यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली होती. याप्रकरणी बच्चू कडू यांच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. भारतीय दंडसंविधानातील कलम 501 अंतर्गत बच्चू कडू यांच्यावर अब्रनुकसानीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.  

बच्चू कडू यांनी गुवाहटीला जाऊन पैसे घेतले असा आरोप रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर केला होता. त्यानंतर राणा यांनी याबाबतचे पुरावे द्यावे असे आवाहन बच्चू कडू यांनी केलं होतं. त्यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी  महिलांबाबत तसेच तृतीय पंथियांच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले आहे, असा आरोप महिला मुक्ती मोर्चाकडून करण्यात आला आहे. बच्चू कडू यांच्या या वक्तव्यामुळे समस्त महिला वर्गाचा अपमान करण्यात आल्याचा आरोप देखील महिला मुक्ती संघटनेने केलाय. त्यामुळेच महिला मुक्ती मोर्चाने बच्चू कडू यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. 

काय म्हणाले होते बच्चू कडू? 
"रवी राणा जर एका बापाची औलाद" असतील तर त्यांनी मी पैसे घेतल्याचे पुरावे द्यावे अन्यथा आम्ही त्यांना 'हिजडा' म्हणून घोषित करू, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं होतं. याबरोबरच राणा यांनी पुरावे दिले तर त्यांच्या घरची भांडी घासू असंही बच्चू कडू म्हणाले होते. बच्चू कडू यांच्या याच वक्तव्याविरोधात महिला मुक्ती मोर्चा संघटनेने तक्रार दिली आहे.  

दरम्यान, रवी राणांबाबत ठोस भूमिका घ्या अन्यथा मोठा धमाका करु असा इशारा देखील बच्चू कडूंचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिलाय. 

महत्त्वाच्या बातम्या

प्रिय दादा! प्रत्येक क्षणी तुझी उणीव जाणवते, आठवणी कायम आमच्या हृदयात राहतील, सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट 
प्रिय दादा! प्रत्येक क्षणी तुझी उणीव जाणवते, आठवणी कायम आमच्या हृदयात राहतील, सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट 
कार्यकर्त्यांनीच संघर्ष का करावा? थेट भाजपमध्येच जाणं योग्य नाही का? बलाढ्य विरोधकांशी लढलो पण कधी...पवारांच्या निष्ठावान शिलेदाराचा राजीनामा
कार्यकर्त्यांनीच संघर्ष का करावा? थेट भाजपमध्येच जाणं योग्य नाही का? बलाढ्य विरोधकांशी लढलो पण कधी...पवारांच्या निष्ठावान शिलेदाराचा राजीनामा
Sharad Pawar : डिलिमिटेशन बिलावरून पवारांच्या राष्ट्रवादीत दोन गट? रोहित पवारांची वेगळी भूमिका?
डिलिमिटेशन बिलावरून पवारांच्या राष्ट्रवादीत दोन गट? रोहित पवारांची वेगळी भूमिका?
Rohit Pawar : मी नात्यांसोबत नाही तर विचारांसोबतच जाणार, रोहित पवार शरद पवारांची साथ सोडणार?
Rohit Pawar : मी नात्यांसोबत नाही तर विचारांसोबतच जाणार, रोहित पवार शरद पवारांची साथ सोडणार?

व्हिडीओ

Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi Sharad Pawar : शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
Delimitation : डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर, 129 पैकी 75 खासदार सरकारच्या साथीला
डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर
Raj Thackeray : हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
Gold Silver Rate : चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले, जाणून घ्या नवी अपडेट
चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले? मुंबई- नवी दिल्लीतील दर जाणून घ्या
Rahul Gandhi : चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची डिलिमिटेशन विरोधात भाजपच्या मिंत्रांसह जेन झीला साद
चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची थेट भाजपच्या मित्रांना साद
Mallikarjun Kharge on Delimitation Bill: डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
Dhairyasheel Mohite Patil : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची डीलिमिटेशनवरील भूमिका कधी ठरणार? धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले...
भूमिका ठरण्याअगोदर टीका कशी केली जाऊ शकते? धैर्यशील मोहिते पाटील यांचा सवाल
Punjabrao Dakh Police Complaint: मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
Embed widget