Gudi Padwa 2022 : तुळजाभवानी मंदिराच्या कळसावर पहाटे उभारली गुढी, देवीला खास दागिन्यांनी सजवलं
महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराच्या गर्भगृहाच्या वर कळसावर गुढी उभारण्यात आली आहे. तसेच देवीच्या मूर्तीला सर्वोत्कृष्ट दागिन्यांचा पेहराव देखील करण्यात आला आहे.
Gudi Padwa 2022 : आज गुढी पाडवा आहे. आजपासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते. या नवीन वर्षाच्या सर्वांना मनपुर्वक शुभेच्छा. आजच्या या शुभ सकाळी महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराच्या गर्भगृहाच्या वर कळसावर गुढी उभारण्यात आली आहे. तुळजाभवानी मंदिरात कोरोनाच्या संकटानंतर तब्बल दोन वर्षानंतर भाविक आणि पुजाऱ्यांच्या उपस्थितीत गुढी पाडवा साजरा होत आहे. मंदिराच्या मुख्य कळसाखाली पहाटे गुढी उभारण्यात आली. देवीच्या मूर्तीला सर्वोत्कृष्ट दागिन्यांचा पेहराव देखील करण्यात आला आहे. या गढी पाडव्यानिमित्त भाविकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.
मंदिरात पारंपरिक पद्धतीनं, विविध कार्यक्रमांनी गुढीपाडवा साजरा होतो. कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये, गर्दी टाळण्यासाठी भाविकांना दर्शनासाठी मंदिर होते. गतवर्षी मंदिरात हा सोहळा साजरा झाला नाही. मंदिराच्या स्थापनेपासून यंदा पुजारी, भाविकांविना हा सोहळा भल्या पहाटे साजरा करतात. तुळजाभवानी कळसावरच्या गुढीनंतर तुळजापुरात गुढी उभारली जाते.
दरम्यान, परंपरेप्रमाणे आज पहाटे अभिषेक झाला. देवीला महावस्त्राचा पेहराव करण्यात आला. दागिने घालण्यात आले. देवीसमोर खडाव ठेवण्यात आले. त्यानंतर महंतांच्या उपस्थितीत गुढी उभी करण्यात आली आहे. तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेच्या मंदिरात गुढीपाडव्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तुळजाभवानी मातेची चरणतीर्थ पूजा करुन पहाटे तुळजाभवानी मातेच्या मुख्य मंदिराच्या शिखरावर गुढी उभारण्यात येते.
देवीच्या मुख्य मूर्तीवर दही, दूध, पंचअमृताने अभिषेक घालण्यात येतो. अभिषेक पूजा होते. देवीला सुंदर मानाचा शालू घालण्यात आला. गुढीपाडवा असल्याने तुळजाभवानी मातेला सुहासिनीच्या रुपात शिवकालीन हिरे, माणिक, रत्नजडीत मौल्यवान दागिने घालून विशेष अलंकार पूजा करण्यात येते. वर्षातून फक्त पाड्व्याच्या दिवशी ही अलंकार पूजा करण्यात येते. तुळजाभवानी मातेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अनेक राजे महाराजे यांनी दागिने अर्पण केले होते. ते दागिने आज घालण्यात आले आहेत. राजा शिवछत्रपती अशी मोहर असलेली सोन्याची 108 पुतळ्याची माळ, रत्नजडित जोडवे देवीला घालण्यात आले आहेत.