एक्स्प्लोर

Nagpur : फक्त अडीच फुट जागेत तब्बल 32 भाज्या; नागपूरच्या स्टार्टअपचा यशस्वी प्रयोग

Indian Science Congress Nagpur News : बियाणे लावल्यापासून 45 दिवसांत यातून भाज्यांचे उत्पादन घेता येते. याची देखभालही जास्त नसल्याने ऑर्गेनिकची आवड असणाऱ्यांसाठी हे वरदान ठरत असल्याचे गोरे म्हणाले.

Indian Science Congress Nagpur News : अलिकडे नागरिकांमध्ये रसायनमुक्त पद्धतीने उगविण्यात आलेल्या सेंद्रीय भाजीपाल्याची खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. तसेच टेरेस गार्डनिंगचीही संकल्पना शहरात वाढली आहे. मात्र जागे अभावी अनेकांना घरीच पालेभाज्या उगवता येत नाही. यावर नागपूरच्या डॉ. दिलीप गोरे यांनी मार्ग काढला असून नागपुरात त्यांनी हायड्रोफोनिक गार्डन (hydroponic garden) स्टार्टअप सुरु केले आहे. यामध्ये फक्त अडीच फूट जागेवर लावण्यात येणाऱ्या स्ट्रक्चरमध्ये तब्बल 32 भाज्या उगवणे शक्य होत आहे.

शहरांमध्ये फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांकडे जागेची कमतरता असते. त्यामुळे पाईपच्या सहाय्याने एक स्ट्रक्चर तयार आले असून यासाठी न्यूट्रिशन, बियाणे, सेन्सॉर, टाईमर तसेच त्यासंदर्भात प्रशिक्षण देऊनही फक्त सात हजार रुपांत हे सर्व शक्य असल्याचे यावेळी डॉ. गोरे यांनी सांगितले. तसेच बियाणे लावल्यापासून तर 45 दिवसांत यातून भाज्यांचे उत्पादन घेता येते. वापरापुरता भाजीपाला कापल्यावर पुन्हा त्याठिकाणी उगवते. त्यामुळे वर्षभरापर्यंत हे वापरता येते. याची देखभालही जास्त नसल्याने ऑर्गेनिक भाजीपाला हवा असणाऱ्यांसाठी हे वरदान ठरत असल्याचे ते म्हणाले.

मागील सहा महिन्यात याचे व्यावसायिक वापर करणे सुरु केले असून नागपुरकरांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही यावेळी त्यांनी नमूद केले. आतापर्यंत शहरात दहा ठिकाणी सेटअप लावण्यात आले आहे. तसेच या इंडियन सायन्स कॉंग्रेसमध्येही नागरिकांकडून या तंत्रज्ञानाबद्दल विचारणा होत असल्याचेही यावेळी ते म्हणाले.

बायोडिग्रेडेबल प्लास्टिक बॅग

डॉ. गोरले यांनी बायोडिग्रेडेबल प्लास्टिक बॅगही तयार केली असून 12 किलोपर्यंत वजन क्षमता आहे. याचे 100 टक्के विघटन 180 दिवसांत होते. त्यामुळे प्रदूषणावरही नियंत्रण सहज शक्य आहे. त्यांच्या या बायोडिग्रेडेबल प्लास्टिक बॅग National Accreditation Board for Testing and Calibration Laboratories (NABL) द्वारा सर्टिफाईड आहे.

शुक्रवारी शेवटचा दिवस; नोंदणी न करताही भेट शक्य

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (RTMNU) अमरावती मार्गावरील प्रवेशद्वारावरुन प्रवेश केल्यावर सरळ गेल्यास उजव्या बाजूला नोंदणी करण्याचे मोठे डोम आहे. या ठिकाणी आपली नोंदणी करता येते. नोंदणी न करता देखील या ठिकाणी असणाऱ्या विज्ञान प्रदर्शनीला भेट देता येते. या विज्ञान प्रदर्शनीत एकूण A ते F असे सहा हॅाल असणार आहेत. हॉल ए मध्ये आयआयटी मद्रास, इंडियन मेरिटाईम युनिव्हर्सिटी, सेंट्रल ग्राऊंड वॉटर बोर्ड, कौन्सिल आफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च आदि स्टॅाल असणार आहेत. यासोबतच नागपुरातील अनेक महाविद्यालये आणि शासकीय संस्थांचे स्टॅाल या हॉलमध्ये असणार आहेत. 

ही बातमी देखील वाचा...

आनंदीबाई जोशी ते कांदबिनी गांगुली; महिला शास्त्रज्ञांच्या माहितीचे विज्ञानयात्रींना अप्रूप

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतंAjit Pawar Akole Speech : तिजोरीची चावी माझ्या हातात.. अकोल्यात अजितदादांची टोलेबाजीABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Embed widget