Gram Panchayat Election 2023 : ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीची सरशी, 'लोकांचा कल महायुतीकडे'; मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया
Gram Panchayat Election 2023 : ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीच्या सर्वाधिक जागा निवडून आल्याचं चित्र आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारांचे आभार मानले.
मुंबई : राज्यात अनेक भागात ग्रामपंचायत (Gram Panchyat) निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळतेय. या निवडणुकांमध्ये महायुतीची (Mahayuti) सरशी झाल्याचं चित्र आहे. यावर मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी म्हटलं की, मतदरांनी महायुतीला मत दिलं,त्यामुळे लोकांना कल महायुतीकडे आहे. तसेच यावेळी मतदारांचे (Voters) मुख्यमंत्री शिंदे यांनी आभार देखील मानले.
राज्यातील एकूण 2359 ग्रामपंचायतीच्या जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. यामध्ये जवळपास 600 पेक्षा अधिक जागांवर भाजपचे (BJP) उमेदवार निवडून आल्याचं पाहायला मिळालं. तर 350 पेक्षा अधिक जागांवर अजित पवार (Ajit Pawar) गटाने वर्चस्व निर्माण केलय. तिसरा क्रमांक हा शिंदे गटाचा (Shinde Group) आहे. त्यामुळे राज्यातील या रणधुमाळीमध्ये महायुतीची सरशी झाल्याचं चित्र आहे.
मुख्यमंत्री शिंदेंनी काय म्हटलं?
'ग्रामपंचायती निवडणुकांमध्ये महायुतीच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या आहेत. मतदारांनी त्यांचा कौल दिलाय. त्यासाठी मी मतदारांचे आभार मानतो. मागील वर्षभरात महाविकास सरकारने थांबवलेली कामं ही महायुतीच्या सरकारने पूर्ण केलीत. या प्रकल्पांना चालना देऊन आम्ही राज्याचा सर्वांगिण विकासाचं काम केलं. खऱ्या अर्थाने शासन आपल्या दारी पोहचलंय. हे सगळं मतदारांनी त्यांच्या कृतीमधून हे दाखवून दिलं', असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
एकही दिवस टिकेशिवाय गेला नाही - मुख्यमंत्री शिंदे
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर देखील निशाणा साधला. 'त्यांचा एकही दिवस टीका टीप्पणी शिवाय गेला नाही. गेल्या वर्षभरात सकाळपासून आरोप प्रत्यारोप त्यांना करता येतात', असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरे गटावर निशणा साधला. 'ते आरोप आणि प्रत्यारोप आता लोकांनी देखील नाकारले आहेत. ज्यांनी लोकांशी बेईमानी केली त्यांना लोकांनी नाकारलय. त्यामुळे खऱ्या अर्थाने लोकांनी शिवसेना, भाजप आणि अजित पवार यांच्या युतीला निवडून आणलंय', असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा
राज्यात अनेक ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळतेय. तर बऱ्याच ग्रामपंचायतींवर महायुतीचं वर्चस्व निर्माण झालाय. बारामती जिल्ह्याने देखील अजित पवारांना कौल दिला. त्यातच आता मुख्यमंत्री शिंदेंनी देखील याचा कौल महायुतीला असल्याचं म्हटलं.