Pune Gram Panchayat Election : पुणे जिल्ह्यात अजित पवार गटाचा करिश्मा; 109 ग्रामपंचायतीवर दणदणीत विजय, तर भाजपची काटेवाडीत एन्ट्री
Pune Gram Panchayat Election : पुणे जिल्ह्यात अजित पवार गटानं यंदा बाजी मारली आहे. अजित पवार गटाने 109 जागेवर विजय मिळवून वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. तर त्यानंतर 34 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे.
पुणे : पुणे जिल्ह्यातील 231 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर (gram panchayat election) झाला आहे. पुणे जिल्ह्यात अजित पवार गटानं यंदा बाजी मारली आहे. अजित पवार गटाने 109 जागेवर विजय मिळवून वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. तर त्यानंतर 34 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. कॉंग्रेसने 25, शिंदे गट 10 , ठाकरे गट 13, शरद पवार गट 27, इतर 11 अशा एकूण 229 जागांवर विजय मिळवला आहे. 231 पैकी दोन जागा रिक्त आहे. एक मुळशीमध्ये तर एक भोरमधील जागेचा समावेश आहे.
पुणे जिल्ह्याला राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हटलं जातं. याच बालेकिल्ल्यात सत्तासंघर्षामुळे अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट झाले आहेत. या जिल्ह्यातील अनेक मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. खासदार आमोल कोल्हे, दिलीप वळसे पाटील, अजित पवार, शरद पवार, हर्षवर्धन पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र याच निवणुकीत अनेक नेत्यांनी आपला दबदबा कायम ठेवला तर अनेक नेत्यांना धक्का सहन करावा लागला.
कोणी गड राखला तर कोणी गमावला...
अमोल कोल्हे आणि दिलीप वळसे पाटील यांना जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात मोठा धक्का सहन करावा लागला. आपल्याच होम ग्राऊंडवर त्यांना पराभव स्विकारावा लागला. दिलीप वळसे पाटील यांनी प्रचार करूनही त्यांचा संतोष टावरे हा सरपंच पदाचा उमेदवार पराभूत झाला आहे. तर रवींद्र वळसे पाटील हा शिंदे गटाचा उमेदवार सरपंच म्हणून निवडून आला आहे. जुन्नर तालुक्यातील खासदार अमोल कोल्हे यांच्या नारायणगावात राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला आहे. नारायणगाव ग्रामपंचयात मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सत्ता कायम राखली आहे. 17 पैकी 16 उमेदवार विजयी झाले असून, सरपंच पद हे ठाकरे गटाकडे गेले आहे. तिकडे इंदापूरात हर्षवर्धन पाटलांनी आपला गट राखला आणि काटेवाडीतदेखील अजित पवारांनी 16 पैकी 14 जागेवर विजय खेचून आणला. मात्र याच काटेवाडीत भाजपने पहिल्यांदाच शिरकाव केला आणि थेट दोन जागांवर विजय मिळवला आहे.
एकूण निकाल कसा आहे?
निवडणूक जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या: 231
निवडणूक रद्द : 2
निवडणूक झालेल्या : 229
पक्षनिहाय निकाल
भाजप : 34
शिंदे गट : 10
ठाकरे गट : 13
अजित गट : 109
शरद गट : 27
काँग्रेस : 25
इतर : 11
इतर महत्वाची बातमी-